मुंबईहुन निघालेल्या जोडप्यांचे चेन्नई एक्सप्रेसमधून ४० लाखांचे दागिने पळविले, सोलापूर हद्दीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:25 PM2018-09-03T12:25:03+5:302018-09-03T12:28:28+5:30

कुर्डूवाडी दरम्यानची घटना : नेल्लूरच्या प्रवाशाकडून बनवेगिरीचा प्रकार?

40 lakhs of jewelery from Mumbai Hatha, ornaments in Solapur area | मुंबईहुन निघालेल्या जोडप्यांचे चेन्नई एक्सप्रेसमधून ४० लाखांचे दागिने पळविले, सोलापूर हद्दीतील घटना

मुंबईहुन निघालेल्या जोडप्यांचे चेन्नई एक्सप्रेसमधून ४० लाखांचे दागिने पळविले, सोलापूर हद्दीतील घटना

Next
ठळक मुद्देटीटीईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाचे नाव विपुल कुमार (मु़ पो़  नेल्लूर)टीटींईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रारसोलापूरचे आरपीएफ पथक, गुन्हे उकल शाखेचे पथक कामाला लागले़

सोलापूर : चेन्नई एक्सप्रेसने मुंबईहून रेणुगुंटला निघालेल्या जोडप्यांचे ४० लाखांचे सोने चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार संबंधित जोडप्याने टीटीईकडे केली. हा प्रकार कुर्डूवाडी-सोलापूरदरम्यान घडला़ दरम्यान  टीटींईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवताना हात आखडता घेतल्याने लोहमार्ग पोलिसांनी या चोरीबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्या प्रवाशाला पोलिसांनी चौकशीसाठी हजर व्हायला सांगितले आहे़ 

टीटीईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाचे नाव विपुल कुमार (मु़ पो़  नेल्लूर) असून, ३१ आॅगस्ट रोजी पहाटे ३ ते ४़३० वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ पत्नीच्या काही वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी विपुल हा तिला घेऊन मुंबईला गेला होता़ ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी दादर-चेन्नई एक्सप्रेसने हे जोडपे रेणुगुंटला निघाले़ वाडी स्थानकावर गाडी येत असताना जवळचे सोने चोरीला गेल्याचे लक्षात आले़ या जोडप्याच्या मते हे सोने कुर्डूवाडी-सोलापूरदरम्यान चोरीस गेले आहे़ त्यांनी लागलीच वाडी रेल्वे स्थानकावर टीटीई गाठून याबाबत तक्र ार दिली़

दिवसभर सीसीटीव्ही फुटेज तपासले
विपुल कुमार याने तक्रार दिल्यानंतर टीटीईने ती आरपीएफ पोलिसांकडे पाठवली़ सोलापूरचे आरपीएफ पथक, गुन्हे उकल शाखेचे पथक कामाला लागले़ दिवसभर अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले़ रेकॉर्डवरच्या अनेकांची चौकशी झाली़ परंतु तपासात खरोखरच सोने पळविल्याचा धागा सापडेना़ अखेर आरपीएफ आणि लोहमार्गच्या पोलिसांनी नेल्लूर येथे विपुलचे घर गाठून त्याच्या कुटुंबाकडे चौकशी केली़ चौकशीत हा प्रकार खोटा असल्याची माहिती पुढे येत आहे़

कुटुंबाकडे चौकशी करताना तो घरी नव्हता़ तपासात या दागिन्यांची पावती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़ इतके दागिने कधी आणि कुठून खरेदी केले? याबाबतही उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सूत्रांनी सांगितले़ त्यामुळे चेन्नई एक्सप्रेसमधील कुर्डूवाडी-सोलापूरदरम्यानचा घडलेला प्रकार म्हणजे बनवेगिरी असल्याचे वर्तविले जात आहे़

Web Title: 40 lakhs of jewelery from Mumbai Hatha, ornaments in Solapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.