इस्त्रीला आलेल्या कपड्यात राहिलेले ४० हजार परत केले माजी खासदारांना
By दिपक दुपारगुडे | Published: June 3, 2023 05:19 PM2023-06-03T17:19:41+5:302023-06-03T17:21:27+5:30
रवी राऊत हे महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात.
सोलापूर : बार्शी येथील एका दुकानात माजी खासदार शिवाजी कांबळे यांचे इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात त्यांनी विसरलेले ४० हजार रुपये धोबी व्यावसायिक रवी राऊत यांच्या हाती लागले. त्यांनी ते प्रामाणिकपणे माजी खासदार कांबळे यांना परत केले. रवी राऊत यांचे कौतुक होत आहे.
रवी राऊत हे महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) समाज सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. त्यांच्याकडे अनेक दिवसांपासून कपडे धुवायला येतात. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी कपडे इस्त्री करण्यासाठी दिले होते. यातील एका पॅन्टच्या खिशात चुकून ४० हजार रुपयांची रोख रक्कम राहिली होती.
इस्त्री करताना रवी राऊत यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ माजी खा. शिवाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला. संबंधित रोख रक्कम गिरीश बरीदे यांच्यासमक्ष त्यांना सुपुर्द केली. याबद्दल माजी खासदार कांबळे यांनी युवा अध्यक्ष रवी राऊत यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून आभार मानले.