४० हजार लोकसंख्येचं वैराग झालं कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:12+5:302021-01-09T04:18:12+5:30

वैराग येथील कोविड सेंटरवर गत १० दिवसांपासून एकही बाधित रुग्ण दाखल झालेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणीत अखेरचा बाधित ...

40,000 people became disillusioned | ४० हजार लोकसंख्येचं वैराग झालं कोरोनामुक्त

४० हजार लोकसंख्येचं वैराग झालं कोरोनामुक्त

Next

वैराग येथील कोविड सेंटरवर गत १० दिवसांपासून एकही बाधित रुग्ण दाखल झालेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणीत अखेरचा बाधित निघालेला रुग्ण ६ जानेवारी रोजी कोरोनामुक्त झाला आहे. आजपर्यंत वैराग भागातून सर्व प्रकारच्या सुमारे ३० हजार कोरोना तपासण्या केल्या आहेत. यामधून वैराग ६००, कोविड सेंटर ८००; तर पुणे, मुंबई, सोलापूर, बार्शी येथे उपचारास गेलेले ३०० असे सुमारे १७०० कोरोनाबाधित निघालेले आहेत.

वैराग कोरोनामुक्त होण्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम, सभापती अनिल डिसले, तहसीलदार प्रदीप शेलार, गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी वैरागला वेळोवेळी भेटी दिल्या व वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड, कोविड केंद्रप्रमुख डॉ. अजित सपाटे, डाॅ. पवन गुंड, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे, तलाठी सतीश पाटील यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे आरोग्यसेविका मनीषा मुंडे, सुवर्णा ढाकणे, शोभा मस्के, कानडे तर आरोग्यसेवक हेमंत पाटील, नागेश कदम, शिवाजी आवारे, जगदीश ताकभाते, अभिजित कांबळे, सुरेश कुंभार यांच्या पथकाने गरोदर माता, रक्तदाब, हृदयविकार यांसह अन्य आजार असलेल्या लोकांची काळजी घेतली.

तसेच ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ व ‘माझे गाव - कोरोनामुक्त गाव’ हे दोन्ही अभियान यशस्वीरीत्या राबविले. व्यापाऱ्यांनी स्वतःहून तपासण्या करून घेतल्या. नागरिकांनीही सर्व यंत्रणांना सहकार्य केले. त्यामुळे आता वैराग कोरोनामुक्त झाल्याचे विलास मस्के यांनी सांगितले.

कोट ::::::::::

वैराग शहरातून सध्या तरी कोरोना हद्दपार झाल्याने दिलासा मिळाला आहे; पण तो देशातून जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण गाफील न राहता सतर्क राहिले पाहिजे. तसेच पहिल्यासारखी सर्वांनी काळजी घ्यावी.

- अनिल डिसले

सभापती, पंचायत समिती, बार्शी

Web Title: 40,000 people became disillusioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.