प्रेमासाठी 'त्या' वाट्टेल ते करताहेत सोलापुरातून ४१ मुली गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 01:57 PM2023-07-21T13:57:04+5:302023-07-21T13:57:25+5:30

अनैतिक संबंधाचंही कारण: पोलिसांनी घरी १९४ जणींना आणलं

41 girls are missing from Solapur because they want 'that' for love | प्रेमासाठी 'त्या' वाट्टेल ते करताहेत सोलापुरातून ४१ मुली गायबच

प्रेमासाठी 'त्या' वाट्टेल ते करताहेत सोलापुरातून ४१ मुली गायबच

googlenewsNext

विलास जळकोटकर

सोलापूर - तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुली बाह्य आकर्षणाला तर विवाहित महिला मानसिक भुलून तर छळ, अनैतिक 5 संबंधातून, नवऱ्याशी भांडण अशा कारणावरून गेल्या सहा महिन्यात २३५ जणी गायब झाल्या. यातील १९४ जणींना त्यांच्याशी सुसंवाद साधून पोलिसांनी त्यांच्या घरी पाठवून त्यांचे जीवन सुसहा केले. अद्याप ४१ जणी गायब असून, त्यांचा शोध सुरू आहे. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात शहरातील विविध भागातून अल्पवयीन मुलींपासून ते विवाहित प्रौढ महिलाही गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.

तरुण मुलींमध्ये मोबाईलवरील चॅटिंग, त्यातून निर्माण होणाऱ्या आकर्षणातून अशा घटना वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शाळा-महाविद्यालयात वाटणाऱ्या बाह्य आकर्षणातून प्रेमासाठी अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या. कालांतराने त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली. काही पळून जाण्यापूर्वी अल्पवयीन असतात. लग्न करून संसार थाटतात. पोलिसांच्या शोधानंतर त्यांना वास्तवतेची जाणीव करून दिली जाते, मुलगी आणि आई-वडिलांशी स निर्माण करून त्यांचा स्थिरस्थावर करण्याची भूमिका बजावावी लागते. वैवाहिक जीवनातून पळून गेलेल्यांनाही कायद्याची जाणीव करून देत विस्कटलेली आयुष्याची व्यवस्थित करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, असा अनुभव पोलिस आयुक्तालयातील सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. 

आम्ही काय करतो?

शाळा-महाविद्यालयातील मुली एका वळणावर उभे असतात. अशांसाठी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये सुसंवाद, जबाबदारीचे जाणीव करुन देण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं. कायद्याबदलच ज्ञान देऊन हितगुज साधण्यावर भर देतो. यामुळे बहुतांश मुलींचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे सुरक्षा शाखेकडून सांगण्यात आले.

मोबाईलचा वाढत्या वापर आणि सोशल मीडियावर विविध घटनांचा नकळपणे मुलीवर परिणाम होतो. आई-वडिलांनी आपली मिका मुलगी काय दिवसभर काय करते. तिचे आजूबाजूचे मित्र कोण आहेत या बाबीवर तिच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवून सुसंवाद वाढवावा, भलेबुरे काय याची जाणीव द्यावी. यामुळे अशा घटनांना प्रतिबंध घालता येऊ शकतो. विजय कबाडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ)

काय आहेत पळून जाण्याची कारणें

■ १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली बाह्य सौंदर्याला भुलून मुलांकडे आकर्षित होतात.

■ वास्तव जगाचा विचार न करता आकंठ प्रेमात बुडतात. आई-वडिलांनी तळहाताप्रमाणे जपल्याचे विसरतात.

■ विवाहित महिला सासरी होणाया त्रासातून टोकाचे पाऊल उचलतात

■परिस्थिती, नक्यांशी सातत्याने होणाऱ्या भांडणातून आसरा शोधतात. 

पालकांनी अन् मुलांची जबाबदारी पालकांनी मुलांना आणि मुलांनी पालकांशी असणारा सुसंवाद वाढवण्याची गरज आहे. आपले मुला-मुलींशी असलेले नाते मित्रत्वाचे असले पाहिजे. प्रत्येक गोष्टी दोघांनीही शेअर केल्या पाहिजेत. मुलींना गरजेनुसार मोबाईल देताना ती कोणाशी बोलते यावर नियंत्रण ठेवा, तिला न रागवता जाणून घ्या. आई- वडिलांचेही मुलीसमोरचे वागणे संस्कारक्षम असले पाहिजे.

त्या एकेचाळीस जणींचा शोध जारी..

२३५ गायब झालेल्या मुली व महिलांपैकी १९४ जणींचा | शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याने त्या आपल्या घरी परतल्या. लवकरच त्या ४१ जणींचाही शोध घेऊन त्यांना सुखरूप स्वगृही पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. 

अन् त्यांचा संसार फुलला

पुण्याची अल्पवयीन मुलगी मुलाबरोबर पळून गेली होती. तिला परत आणून सोलापुरात मामाकडे सोडले. दरम्यान आई-वडिलांनी तिचे लग्न जमविण्याची खटपट सुरू केली. याकाळात ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. लग्न केले. तपासात दोघंही सापडली. पोलिसांनी आई-वडिलांना समजावून सांगितले. आता दोघांचाही संसार सुखाने सरु आहे.

Web Title: 41 girls are missing from Solapur because they want 'that' for love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.