Solapur Elections: सोलापूर लोकसभेसाठी दुपारपर्यंत ४१.३९ टक्के मतदान; १४९ व्हीव्हीपॅट मशीन्स बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 04:36 PM2019-04-18T16:36:53+5:302019-04-18T16:38:54+5:30
सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानात दुपारी एक वाजेपर्यंत ४१.३९ टक्के मतदान मतदारांनी केले़ दुपारचे ऊन टाळण्यासाठी सकाळी मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे, मात्र हे मशीन हाताळण्यास योग्य नसल्याने यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत़ दुपारी १ वाजेपर्यंत एकूण १४९ मशीन बदलण्यात आली तर ६९ बॅलेट युनिट, १८ कंट्रोल यंत्र बदलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात बºयाच ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. बंद पडलेली मशीन पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार तलाठी यांची चांगलीच धावपळ उडाली होती़ दरम्यान मतदान सुरळीत होत आहे़ बंद पडलेल्या मशीनचे ठिकाणी तातडीने मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.