कुर्डुवाडी जनता सहकारी बँकेची ४२ वी सर्वसाधारण सभा ऑनलाइनद्वारे मोठ्या उत्साहात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:55+5:302021-02-23T04:34:55+5:30
येथील जनता सहकारी बँकेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांची काळजी घेत ऑनलाइन मीटिंगद्वारे घेण्यात आली. ...
येथील जनता सहकारी बँकेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांची काळजी घेत ऑनलाइन मीटिंगद्वारे घेण्यात आली. यात सन २०१९-२० या वर्षाचा ताळेबंद व नफातोटा याबाबत चर्चा, मागील सभेचा वृतान्त वाचणे, बाहेरील कर्ज उभे करणे, नफा वाटण्याला मान्यता देणे व सन २०-२१ वर्षाचे अंदाजपत्रक तयार करणे, यासारख्या विषयांवर चर्चा होऊन सभासदांतून मंजुरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अर्जुन बागल होते.
येथील रोटरी क्लब सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जनता बँकेच्या सर्वसाधारण सभेत प्रथम उपस्थित सभासदांचे शाखा व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी स्वागत केले. त्यानंतर, गत वर्षामध्ये आकस्मिकपणे निधन झालेले बँकेचे सभासद, शहीद जवान, काही राजकीय नेते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर विजय गायकवाड यांनी अहवाल वाचन केले. त्यास सर्वानुमते मजुरी देण्यात आली.
या सर्वसाधारण सभेस चेअरमन अर्जुन बागल, व्हाइस चेअरमन अनिल तरटे, संचालक सुरेश शहा, फुलचंद धोका, अशोक खाडे, जगन्नाथ क्षीरसागर, विक्रम बोराडे, राजेंद्र आरगडे, सुलभा दास, दिलीप तळेकर, अरुण गिड्डे, दिलीपचंद धोका, किरण दोशी, मोनिका शहा, विश्वनाथ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभासदांतून विजयसिह परबत, विनायक राऊत, अरुण व्यवहारे, बाळासाहेब गोफणे, डॉ. राजेंद्र दास, मधुकर बागल, अक्षय खाडे, सुरेश कदम, सुधीर मराळ, अर्जुन आतकर, अजित पुरवत, संतोष शेंडे, संजय चव्हाण आदींसह ३८ सभासद सहभागी झाले होते. सभा यशस्वी करण्यासाठी सुहास मराळ, सत्यवान जगदाळे, सुनीता साळुंखे, दत्तात्रेय शिंदे, राहुल डिकोळे, पांडुरंग लोंढे, प्रसाद कन्हेरे, अमोल दिंडोरे यांनी परिश्रम घेतले. शेवटी सभासदांचे आभार जगन्नाथ क्षीरसागर यांनी मानले.
फोटो ओळ-
२२कुर्डुवाडी-जनता बँक
कुर्डुवाडी येथील जनता सहकारी बँकेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. यावेळी व्यासपीठावर चेअरमन अर्जुन बागल, व्हाइस चेअरमन अनिल तरटे, संचालक अशोक खाडे, जगन्नाथ क्षीरसागर, सुलभा दास, मोनिका शहा आदी.