अक्कलकोट येथे पुन्हा ४४ बाधित नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:20+5:302021-05-01T04:21:20+5:30
गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी येत असलीतरी मृत्यू अधिक होत होते. आता तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्येही रोज वाढ होत ...
गेल्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी येत असलीतरी मृत्यू अधिक होत होते. आता तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्येही रोज वाढ होत आहे.
रस्त्यावरील नागरिकांची गर्दी कमी नाही. आजार अंगावर काढणे, तात्पुरते उपचार करून घेणे, हे प्रकार आता नित्याचेच झालेले आहेत. ग्रामीण भागात लग्न, अंत्ययात्रेला आजही मोठी गर्दी होत आहे. यामुळे सध्या कोरोनाचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे.
शुक्रवारी निघालेल्या रुग्णांत अक्कलकोट शहर ४ तर ग्रामीण ४० असे ४४ रुग्ण नव्याने निघाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे यांनी दिली.
----
गावनिहाय कोरोना रुग्ण असे
दुधनी-१, मैंदर्गी-८, समर्थनगर-१, हंजगी-१, काझीकणबस-२, गुरववाडी-१, जेऊर-५, वसंतराव नाईकनगर-१, वागदरी-१, नाविदगी-२, बऱ्हाणपूर-१, चिंचोळी (न.)-१, केगाव बु-१, मंगरुळ-१, मुंढेवाडी-१, कोर्सेगाव-१, चप्पळगाव-१, हंनुर-१, कोन्हाळी-१, शिरवळवाडी-२, सलगर-४, आदी ४० तर शहरमधील खासबाग-२, बुधवारपेठ-१, सम्राट चौक १ असे चार एकंदरीत ४४ रुग्ण नव्याने आढळून आलेले आहेत.
-----