बार्शीत अन्नछत्रालयास ४५० किलो धान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:02+5:302021-05-25T04:25:02+5:30
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी साहित्यिक हा समाजाच्या मनाला उभारी देण्याचे काम करत असतो आणि बुद्धीसोबतच पोटाची भूक ...
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी साहित्यिक हा समाजाच्या मनाला उभारी देण्याचे काम करत असतो आणि बुद्धीसोबतच पोटाची भूक भागविण्याचा मंडळाचा आजचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी ज्येष्ठ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांनीही मनोगतामध्ये सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे समाजात सुखाची पेरणी होत असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, अशोक हेड्डा, मुरलीधर चव्हाण, प्रा. किरण गाढवे, अशोक इनामदार, प्रा. सुरेश राऊत, बापू तेलंग यांच्यासह कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, सचिव चन्नबसवेश्वर ढवण, प्रकाश गव्हाणे, शब्बीर मुलाणी, डॉ. रविराज फुरडे, संतोष पाठक, हर्षद लोहार आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कवी कालिदास मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, कार्याध्यक्ष प्रा. अशोक वाघमारे, कोषाध्यक्ष गंगाधर आहिरे, सहसचिव आबासाहेब घावटे, सदस्य डॉ. कृष्णा मस्तुद, दत्ता गोसावी, सुमन चंद्रशेखर, शिवानंद चंद्रशेखर आदींचेही सहकार्य लाभले आहे.
-----
फोटो : २३ बार्शी
कवी कालिदास मंडळाच्यावतीने अन्नछत्रालयास ४५० किलो धान्याची मदत करताना उपस्थित मान्यवर.
----