नऊ महिन्यांत ४५९ लाचखोर जाळ्यात; महसूल, नोंदणी कार्यालयात सर्वाधिक लाचखोर 

By appasaheb.patil | Published: October 2, 2020 02:12 PM2020-10-02T14:12:37+5:302020-10-02T14:14:52+5:30

पुणे विभागात सोलापूर दुसºया क्रमांकावर; पोलिस खात्यातही लाचखोर वाढले

459 bribe takers; Revenue, the most corrupt in the registration office | नऊ महिन्यांत ४५९ लाचखोर जाळ्यात; महसूल, नोंदणी कार्यालयात सर्वाधिक लाचखोर 

नऊ महिन्यांत ४५९ लाचखोर जाळ्यात; महसूल, नोंदणी कार्यालयात सर्वाधिक लाचखोर 

Next
ठळक मुद्दे एसीबी कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, म्हणून टोल फ्री क्रमांक, आॅनलाईन तक्रारी घेणे सुरू केलेप्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप नंबर जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करून दिलेराज्यातील कानाकोपºयातील नागरिकांना लाचखोरांविरुद्ध तक्रार करणे सुलभ

सुजल पाटील 

सोलापूर : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांकडून लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या वर्षातील नऊ महिन्यांत महाराष्टÑ राज्यात तब्बल ४५९ जणांनी लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे़ भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालयातील प्रकरणे अधिक आहेत. 

 एसीबी कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, म्हणून टोल फ्री क्रमांक, आॅनलाईन तक्रारी घेणे सुरू केले. प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप नंबर जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यातील कानाकोपºयातील नागरिकांना लाचखोरांविरुद्ध तक्रार करणे सुलभ झाल्याने लाचखोरांच्या तक्रारीत वाढ झाली़ शिवाय एसीबीच्या प्रत्येक अधिकाºयाने त्या तक्रारीवर अ‍ॅक्शन घेतल्याने लाचखोर जाळ्यात सापडले़ २०२० मधील जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ४५९ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे़ यात महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालये टॉपवर असून, त्यानंतर पोलीस, पंचायत समिती, वनविभाग, महानगरपालिका, नगरपरिषद खात्याचा नंबर लागतो.

अपसंपदाचे १० तर अन्य २० कारवाया
राज्यात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती (अपसंपदा) व अन्य भ्रष्टाचाराच्या आलेल्या तक्रारींवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़ यात १० अपसंपदाचे तर अन्य भ्रष्टाचाराच्या २० कारवाया करण्यात आल्या आहेत़ अपसंपदामध्ये २१ आरोपींविरुद्ध १० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तर अन्य भ्रष्टाचाराच्या कारवायांत १०९ आरोपींविरुद्ध २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ 

लॉकडाऊनमुळे लाचखोर घटले...
कोरोनामुळे राज्यात मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते़ दरम्यान, याचा परिणाम लाचखोरांवरही झाला. मार्चमध्ये ५८, एप्रिल ०७, मे ३०, जून ६४, जुलै ५६, आॅगस्ट ४८ तर सप्टेंबर महिन्यात ५६ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत़ लॉकडाऊनमुळे सापळा कारवाई ३० टक्क्यांनी घटली़ 

विभागनिहाय लाचखोरांची संख्या
विभाग    गुन्हे    आरोपी

  • पुणे    १०६    १५३
  • नाशिक     ६७    ८३
  • अमरावती    ६६    ९०
  • नागपूर    ६३    ८१
  • औरंगाबाद    ५८    ८१
  • नांदेड    ५७    ८०
  • ठाणे     ३२    ५०
  • मुंबई     १०    १६

Web Title: 459 bribe takers; Revenue, the most corrupt in the registration office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.