४६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:00+5:302021-05-11T04:23:00+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत सांगोला ग्रामीण रुग्णालयात १९,७१५ जणांच्या ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत सांगोला ग्रामीण रुग्णालयात १९,७१५ जणांच्या घेतलेल्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये १७०३ जण पॉझिटिव्ह मिळून आले. तर ग्रामीण भागातील ३८,३०३ जणांच्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ३४१९ जण पॉझिटिव्ह सापडले. ग्रामीण रुग्णालयात १५५४ जणांच्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये २२८ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात १३,७१९ आरटीपीसीआर टेस्टमध्ये ८४६ जण पॉझिटिव्ह आढळले.
सांगोला तालुक्यात ७३,२९१ जणांच्या कोरोना चाचणीत ६१९६ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्के राहिला आहे. तथापि कोरोनाशी फाइट करून पुन्हा स्वगृही परतणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ४६७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरी, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोट :::::::::::::::::
लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क वापरण्याबरोबरच सुरक्षित अंतरही पाळणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत. सध्या कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन ०:३० टक्क्यांवर आला आहे. सिहंगड इन्स्टिट्यूट कमलापूर व फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज या कोविड केअर सेंटरमध्ये २७१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. शहरातील हॉस्पिटलमध्ये ११४ जणांवर उपचार सुरू आहेत.
- अभिजीत पाटील
तहसीलदार, सांगोला