बार्शी तालुक्यातील ४८ शाळा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:25+5:302021-07-12T04:15:25+5:30
बार्शी : राज्य शासनाने १५ जुलैपासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ...
बार्शी : राज्य शासनाने १५ जुलैपासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता दिली आहे. तालुक्यातील १३० गावांपैकी ९५ गावे ही कोरोनामूक्त झाली आहेत. या गावांतील ४८ माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांनी दिली.
माध्यमिक शाळांत ३६२ शिक्षक,१९५ शिक्षकेतर कर्मचारी व ६०८४ विद्यार्थी आहेत. हळदुगे, मळेगाव, उपळे, झरेगाव, झाडी, ममदापूर, बावी, काळेगाव, उंडेगाव, ढोराळे, मुंगशी, सर्जापूर, सासुरे, सरोळे, तडवळे, मांडेगाव, उंबर्गे, इर्ले, मानेगाव, तुळशीदासनगर, भातंबरे, यावली, तांबेवादी, गाताचीवाडी, अलीपूर, सौंदरे, शेलगाव मा, तावडी, घाणेगाव, हिंगणी, पिंपरी, साकत, घारी, शिराळे, जवळगाव नंबर १ व २, कासारी, रुई, कव्हे, कासारवाडी, मालवंडी, सुर्डी, चारे, चुंब, काटेगाव या ४८ गावांतील शाळा सुरू होऊ शकतात.