मोहोळ तालुक्यात आमदार निधीतून ४९१० ग्रंथ भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:07+5:302021-03-18T04:22:07+5:30

नरखेड : मोहोळ तालुक्यातील १५ सार्वजनिक वाचनालयास विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा व आमदार नीलय नाईक यांच्या स्थानिक ...

4910 books donated from MLA fund in Mohol taluka | मोहोळ तालुक्यात आमदार निधीतून ४९१० ग्रंथ भेट

मोहोळ तालुक्यात आमदार निधीतून ४९१० ग्रंथ भेट

Next

नरखेड : मोहोळ तालुक्यातील १५ सार्वजनिक वाचनालयास विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा व आमदार नीलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून ११ लाख २० हजार रुपये किंमतीची ४९१० पुस्तके भेट देण्यात आली.

व्यापारी वाचनालय - मोहोळ (५७८), कै.शहाजीराव शं.पाटील वाचनालय - नरखेड (३८७ ग्रंथ ), सूरज वाचनालय - ढोकबाभुळगाव (३८७), ज्ञानोबा कादे वाचनालय-

वाळूज (३८७ - ग्रंथ), जयकिसान वाचनालय-

म .चौधरी (३८७ ग्रंथ), महालक्ष्मी वाचनालय-

इंचगाव (३८७), संत तुकाराम वाचनालय-सोहोळे (३८७), स्वामी समर्थ वाचनालय-कामती (३८७ ग्रंथ), श्रीहरी वाचनालय

वडाची वाडी (३८७), प्रथमेश वाचनालय

- न जिक पिंपरी (३०९) , संध्या छाया वाचनालय-मोहोळ (३०९), मनोहर डोंगरे वाचनालय-हराळवाडी (१५४), प्रियदर्शनी वाचनालय-मोहोळ (१५४), लोकनेते बाबुराव पाटील वाचनालय - भांबेवाडी (१५४), शिवप्रभू वाचनालय - पोफळी (१५४) आदी मोहोळ तालुक्यातील १५ वाचनालयास ११ लाख २० हजार रुपये किमतीची एकूण ४९१० ग्रंथ आमदार वजाहत मिर्झा व आमदार निलय नाईक यांच्या निधीतून भेट देण्यात आली.

जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक विजयकुमार पवार यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालयास भास्कर कुंभार, दिलीप देशपांडे यांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली.

यावेळी सुशांत कादे, भास्कर कुंभार, दिलीप देशपांडे, हणमंत पवार, उत्तम मेटकरी, गजानन झेंडगे, जनाबाई शिंदे, चरण शेळके, दादा गायकवाड, गो .रा . कुंभार, शहाजान बागवान,

गणेश हावळे मान्यवर उपस्थित होते.

--

१७ नरखेड

शहाजीराव पाटील वाचनालयाला ग्रंथसंपदा भेट देताना जिल्हा ग्रंथालय संचालक भास्कर कुंभार

Web Title: 4910 books donated from MLA fund in Mohol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.