पाच एकर क्षेत्रात घेतली २६ लाखांची केळी; दुबईच्या बाजारपेठेत पंढरपुरातील केळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:12 AM2020-02-14T11:12:50+5:302020-02-14T11:16:22+5:30
तुंगतच्या शेतकºयाची यशोगाथा; तुंगतच्या शिवानंद रणदिवे यांची यशोगाथा
अंबादास वायदंडे
सुस्ते : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील एका शेतकºयाच्या केळीने थेट दुबईची बाजारपेठ काबीज केली आहे. पाच एकरात २०० टन केळीचे उत्पन्न निघाले असून, त्यांना २१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. केवळ सरी न सोडता ड्रीपद्वारे पाणी देऊन बाग जतन करणाºया तरुण शेतकºयाची कहाणी आहे.
शिवानंद रणदिवे असे त्या तरुण शेतकºयाचे नाव आहे़ त्यांनी शेतीची मशागत करून पाच एकरात पाच बाय सात अंतरावर केळी लागवड केली़ मोकळ्या शेतामध्ये केवळ सरी न सोडता ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा केला़ गणेश या वाणाच्या ६ हजार ५०० इतक्या रोपांची त्यांनी १ मार्च २०१९ रोजी पाच एकर क्षेत्रावर लागवड केली.
ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने केळीची रोपे सुकू लागली होती. परंतु रणदिवे यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. त्यांनी प्रत्येक केळीच्या रोपाला घागरीने पाणी घालून बाग जतन केली. नेटके नियोजन आणि मशागत या तत्त्वानुसार शेती फुलवली़ शिवानंद रणदिवे यांची प्रगतिशील शेती पाहण्यासाठी नेहमीच आसपासच्या शेतकºयांची गर्दी असते. रणदिवे यांनी तुंगत येथील सुनील अंद या युवकाच्या मदतीने केळीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
लागवडीनंतर बायोटेकचे अमृत कीट, १९ : १९ : १९ हे केळी या पिकांची मुळी जास्त वाढावी, यासाठी देण्यात आले. महाधन २४ : २४, १८ : ४६ हे पाच एकरासाठी एकूण १२५ बॅगा देण्यात आल्या आहेत. आठ महिन्यांनंतर घड बाहेर पडल्यानंतर यारा कंपनीच्या मायक्रो न्यूट्रीशियनचा २ मि.ली.ने स्प्रे देण्यात आला. यानंतर निकनेल ३२, १३ : ० : ४५ यांचा स्प्रे देण्यात आला.
दुबईला १९० टन केळीची निर्यात
- योग्य व्यवस्थापनानंतर २ फेब्रुवारी २०२० रोजी पहिली तोड केली़. पंजाब येथील बाजारपेठेत १० टन केळी १२ रुपये ५० पैसे किलो दराने पाठविण्यात आली. कंदर (ता. करमाळा) येथील एका फ्रूट कंपनीच्या मदतीने तुंगतमधील केळी आता दुबई गाठत आहे. दुबईला १९० टन केळीची निर्यात होत असून, १३ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.