झोपडपट्टीतील घर विक्रीत पाच लाखाची फसवणूक; दोघांविरूद्ध फौजदार चावडी पोलिसात गुन्हा
By रवींद्र देशमुख | Published: May 29, 2024 07:10 PM2024-05-29T19:10:57+5:302024-05-29T19:11:13+5:30
राहुल कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या पत्नीस ॲट्रॉसीटीची धमकी दिली. असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
सोलापूर - मनोहर नगर झोपडपट्टी येथील घर जागा विक्री करतो असे सांगून, पाच लाख १० हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाबा मलिक अब्दुलगणी शेख (रा. मनोहर नगर झोपडपट्टी, मुरारजी पेठ), गोविंद बब्रुवान कांबळे (रा. निराळे वस्ती, मुरारजी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. फिर्यादी राहुल जनार्दन कांबळे (वय ३१ रा. मंगळवार पेठ) यांना घर विक्री करतो म्हणून, त्यांच्याकडून फोन पे वरून व रोख स्वरूपात पाच लाख १० हजार रूपये घेतले. मात्र घरजागा विक्री केली नाही. १० ऑक्टोंबर २०२२ रोजी १०० रूपयाच्या बॉन्डवर केलेली इसारा पावती रद्द केलेली नसताना, परस्पर नोटरी दस्त कमरूनिसा रफिक बागवान यांच्याकडे नोटरी केली.
१० ऑक्टोंबर रोजीची इसारा पावती रद्द झाल्याची नोटरी करून फसवणूक केल्याचे राहुल कांबळे यांच्या लक्षात आले. याबाबत चौकशी करण्यासाठी गेले असता, राहुल कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या पत्नीस ॲट्रॉसीटीची धमकी दिली. असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.