‘युटोपियन’कडून ५ लाख मे. टन ऊस गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:20+5:302021-02-23T04:34:20+5:30
ऊस उत्पादकांच्या हितासाठी युटोपियन शुगर्स या साखर कारखान्याची निर्मिती केली. तो कारखाना टिकणे व टिकवणे ही काळाची गरज आहे. ...
ऊस उत्पादकांच्या हितासाठी युटोपियन शुगर्स या साखर कारखान्याची निर्मिती केली. तो कारखाना टिकणे व टिकवणे ही काळाची गरज आहे. हंगामाच्या सुरवातीला सलग दोन महिने ८.५ ते ९ टक्के इतकी कमी रिकव्हरी मिळाली. त्यामध्ये सुधारणा होऊन ती १० च्या आसपास राहिली. सध्या साखरेला उठाव नसल्याने साखर विक्री व दरावर परिणाम झाला आहे. साखरेचा किमान विक्री दर ३६ रुपये करणे आवश्यक आहे, अन्यथा कारखानदारी मोडून पडेल, असे उमेश परिचारक यांनी सांगितले. सूत्रसंचालन सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले.
कामगारांना गुणवत्तेनुसार पगारवाढ
कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांची पगारवाढ करणे गरजेचे आहे. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा किमान पगार ७८०० रूपये करण्यात येणार असून सदरची वाढ ही कारखाना प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच कामगारांच्या गुणवत्तेनुसार त्यांना ही पगार वाढ करण्यात येत असल्याचे उमेश परिचारक यांनी सांगितले.
फोटो ओळी : ::::::::::::::::::::::::::::::
युटोपियन शुगर्सच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गव्हाणीत मोळी टाकून करताना कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक. यावेळी उपस्थित सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी.