सोलापूरात ५ लाखाची हातभट्टी दारू जप्त, वळसंग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडली पोलीसांनी गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:42 AM2018-02-01T11:42:00+5:302018-02-01T11:43:44+5:30
सोलापूर-अक्कलकोट मार्गावर विना परवाना अवैधरित्या हातभट्टी वाहतुक करणारी टाटा सुमो गाडी अडवून सुमारे ५ लाखांची दारू वळसंग पोलीसांनी जप्त केली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : सोलापूर-अक्कलकोट मार्गावर विना परवाना अवैधरित्या हातभट्टी वाहतुक करणारी टाटा सुमो गाडी अडवून सुमारे ५ लाखांची दारू वळसंग पोलीसांनी जप्त केली़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ आपल्या कर्मचाºयांसमवेत अक्कलकोट रोडवरील वळसंग येथे नाकाबंदी करीत थांबले होते़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ यांनी संशयरित्या येत असलेल्या वाहन टाटा सुमो एमएच १३ एफ ९५१० यास थांबण्यास सांगितले़ मात्र वाहनचालकाने हे वाहन न थांबविता थेट वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला़ याबाबत पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ यांना संशय आल्याने अडसुळ यांनी आपल्या कर्मचाºयांना मदतीला घेऊन त्या वाहनाचा पाठलाग केला़ सिनेस्टाईल पाठलाग करून सोलापूर शहरानजीक हे वाहन अडविण्यात आले़ ते वाहन तपासणी केली असता त्यात ४०० लिटर हातभट्टी दारू मिळून आली़
सदर मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवुन वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे़ या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ, सहा़ पोलीस निरीक्षक मंगाने ,पवार, पोहेकॉ/इनामदार, गायकवाड,चव्हाण, काळजे, पाटील यांनी केली़