अकलूजमध्ये ५० ऑक्सिजन बेडचे मंगळवेढ्यात २५ बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:18+5:302021-04-24T04:22:18+5:30
सर्वत्र कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अकलूज हे मेडिकल हब असल्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पालकमंत्र्यांनी ...
सर्वत्र कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अकलूज हे मेडिकल हब असल्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पालकमंत्र्यांनी अकलूज येथे कोविड संदर्भात आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाची बैठक घेतली.
यावेळी पालकमंत्री भरणे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची आचारसंहिता सुरू असल्यामुळे मला गत महिन्यात या भागात बैठका घेता आल्या नाहीत. त्यामुळे आता अकलूज, पंढरपूर,मंगळवेढा व सोलापूर येथे बैठका घेत आहे, असे सांगितले.
प्रांताधिकारी शमा पवार यांनी रेमडेसिविरचा तुटवडा असल्यामुळे मागणी तसा पुरवठा होत नाही. जेवढी इंजेक्शन उपलब्ध असतील ती डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे पुरवण्यात येत आहेत. यापूर्वी ज्या कोविड सेंटरची जेवणाची बिले राहिली होती ती अदा केली आहेत, असे सांगितले.
बैठकीस आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उत्तमराव जानकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी शीतलकुमार जाधव, सिव्हिल सर्जन प्रदीप ढेले, प्रांताधिकारी शमा पवार, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू, सभापती शोभा साठे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्रेणिक शहा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, अकलूज पोलीस ठाण्याचे पीआय अरुण सुगावकर, बाळासाहेब धाईजे, अजय सकट यांच्यासह अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.