गुरव समाजासाठी ५० कोटीचे भांडवल; उर्वरित मागण्याबाबत लवकरच मुंबईत बैठक
By Appasaheb.patil | Published: March 20, 2023 03:39 PM2023-03-20T15:39:49+5:302023-03-20T15:40:08+5:30
उर्वरित मागण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - गुरव समाजासाठी श्री संत काशिबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. याशिवाय या महामंडळासाठी ५० कोटी रूपयांचे भांडवल सरकारकडून मिळाले आहे. उर्वरित मागण्यासंदर्भात लवकरच मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण-विखे पाटील यांनी दिली.
गुरव समाजाला राज्य सरकारने खर्या अर्थाने न्याय दिल्याबद्दल राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विजयराज शिंदे, राष्ट्रीय महासचिव मल्लिकार्जुन गुरव आणि राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंतराव पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यशवंत ढेपे यांनी महसूलमंत्र्याचा सन्मान केला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महा अधिवेशन १ १डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर येथे झाले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरव समाजाच्या मागण्याबाबत सकारात्मक विधान केले होते. या विधानाला अधिवेशातील अर्थसंकल्पात तरतूद करून घोषणा केली. यामुळे गुरव समाजातील हजारो लोकांना फायदा होणार असल्याचेही यावेळी सांगितले. उर्वरित मागण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.