आषाढी वारीत आतापर्यंत ५० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:15 PM2019-07-12T12:15:49+5:302019-07-12T12:18:13+5:30
वारकºयांची खरेदी; प्रासादिक साहित्य, मूर्ती, उपवासाचे पदार्थ यांची विक्री
पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी येत असतात़ त्यादृष्टीने व्यापारीही नियोजन करतात. आतापर्यंत विविध प्रासादिक साहित्य, मूर्ती, उपवासाचे पदार्थ, बॅगा यासह अन्य वस्तंमधून सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला.
पंढरपुरात प्रमुख चार वारीपैकी आषाढी मोठी वारी असल्याने विविध पालखी सोहळे, दिंड्यांमधून लाखोंच्या संख्येने भाविक येतात़ हे भाविक पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना नक्कीच पांडुरंगाचा प्रसाद म्हणून काहीतरी खरेदी करतात़ त्यामुळे विविध वस्तू आणि साहित्यांच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित असते़ आषाढी वारी आली की महिनाभरापासून व्यापारी वर्गांची तयारी सुरू असते़ मंदिर परिसरातील व्यापारी वर्षभराची उलाढाल केवळ एका वारीतून होत असल्याचे गृहीत धरून नियोजन करतात.
देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यापासून किंवा त्यापूर्वीही पंढरीत भाविकांची रेलचेल सुरू असते़ भाविक पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर घरी जाताना पांडुरंगाचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्ताशे, कुंकू, बुक्का, पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो, पेढा आदी साहित्य खरेदी करतात.
स्थानिक व्यापाºयांबरोबरच बाहेरून येणाºया व्यापाºयांची संख्याही जास्त असते़ त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे़ ढोबळ मानाने विचार केल्यास आतापर्यंत पंढरपुरात १० लाख वारकरी दाखल झाले आहेत़ त्यापैकी प्रत्येकाने किमान ५०० रुपये जरी खर्च केले असे गृहित धरले तरी ५० कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात आले.
अशी झाली उलाढाल
आषाढी वारीत आतापर्यंत चुरमुरे १ कोटी ५० लाख, बत्ताशे ४० लाख, कुंकू, बुक्का, अष्टगंध यामधून ३० लाख, पेढा एक कोटी, मूर्ती व फोटोतून ५० लाख, अगरबत्ती २ कोटी, शाबुदाणा, शेंगदाणे, केळी, वेफर्ससह अन्य फळांमधून सुमारे २ कोटी ५० लाख, बॅगा ३ लाख यासह हॉटेल, लॉज, बॅगा, घोंगडी, संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांसाठी खेळणी, टाळ, मृदंग, वीणा, पखवाज, पालखी यामधून ५० कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला़