सोलापूर शहरात ११ महिन्यात बेशिस्त चालकांकडून ५० लाखांचा दंड, २२ हजार ७३२ केसेस : उत्तर वाहतूक शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:50 PM2017-12-26T12:50:58+5:302017-12-26T12:53:57+5:30
वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा व ट्रिपल सीट जाणाºया अशा प्रकारच्या विविध २२ हजार ७३२ वाहनांवर उत्तर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे.
अमीत सोमवंशी
सोलापूर दि २६ : वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा व ट्रिपल सीट जाणाºया अशा प्रकारच्या विविध २२ हजार ७३२ वाहनांवर उत्तर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे. कारवाईपोटी आकारलेल्या दंडातून शासनाच्या तिजोरीत ४९ लाख २४ हजार ८५० रुपयांचा महसूल जमा केल्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले.
उत्तर शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. बेशिस्त वाहतुकीला वठणीवर आणण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून होत असला तरीही वाहतुकीत काही प्रमाणात बेशिस्तच राहते. वाहनधारकांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळल्यास बेशिस्त वाहतूक बºयापैकी आटोक्यात येऊ शकते. नियमांना धाब्यावर बसविणाºया वाहनधारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान कारवाई मोहीम राबविली.
यात एकूण २२ हजार ७३२ वाहनांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे आढळून आल्याने वाहतूक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यात ४९ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, रहदारीस अडथळा, मद्य सेवन करून वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट, भरधाव वाहन चालविणे, रस्त्यावर हातगाडी, चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे़
मोबाईलवर बोलणे पडले महागात
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर असले तरी अनेक जण सर्रास हा प्रकार करीत असल्याचे शहरांमधील चित्र आहे. अनेकांनी मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याची जीवघेणी कला अवगत केल्याचे दिसून येते. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया २ हजार २१८ जणांवर वाहतूक शाखेने कारवाई करुन ४ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मद्य प्राशन करून वाहन चालविणाºया १०६ चालकांवर कारवाई करुन १ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
---------------------
अशी झाली कारवाई...
- गेल्या अकरा महिन्यात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांजवळ लायसन्स नसणे, लायसन्स नसलेल्या इसमास वाहन चालवण्यास देणे, नो पार्किंग, नो एंट्री, लर्निंग लायसन्सचे एल बोर्ड नसणे, रिक्षाचे फ्रंट सीट, जीप फ्रंट सीट वाहनांचे कागदपत्र जवळ न बाळगणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहनास नंबर प्लेट नसणे, नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ओव्हर लोड, गडद काचा, मालवाहू वाहनातून माणसे वाहून नेणे, नियमापेत्रा जास्त प्रवासी बसवणे, वाहनचालकास ड्रेस नसणे, वाहन कागदपत्रांचा अभाव, अवैध प्रवासी वाहतूक, आदेशाचे पालन न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, रहदारीला अडथळा आदी विविध कायद्याखाली २२ हजार ७३२ कारवाई अंतर्गत ४९ लाख २४ हजार ८५0 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
-----------------
शहरात पार्किंगचा अभाव...
- शहरातील मुख्य बाजारपेठेत कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. या मार्गावर मोठमोठे व्यापारी संकुले आहेत. परंतु पार्किंगची व्यवस्था नाही. येथे येणारे नागरिक आपली वाहने सुरक्षितपणे उभी ठेवण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर ठेवतात. त्यानंतर अशा वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत.