बोपलेत ५० जणांना मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:20+5:302021-05-13T04:22:20+5:30
बोपले शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक यांनी गावात कोविशिल्ड लसीकरणासाठी ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी नोंदणी मोहीम राबवून ८५ ग्रामस्थांची ऑनलाईन ...
बोपले शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक यांनी गावात कोविशिल्ड लसीकरणासाठी ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी नोंदणी मोहीम राबवून ८५ ग्रामस्थांची ऑनलाईन नोंदणी केली व लस घेण्याचे आवाहन केले होते.
यासाठी नरखेड आरोग्य केंद्रामार्फत शिबिर घेण्यात आले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. किरण बंडगर यांनी ५० लस उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार नागरिकांचे लसीकरण केले
गावामध्येच लस उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याकामी सर्व शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले.
याप्रसंगी रणजीत देशमुख, उपसरपंच रवींद्र देशमुख, मुख्याध्यापक परमेश्वर गुंड, आप्पासाहेब देशमुख, रमाकांत पवार, गणेश नागमे, सुधीर पाचपुले, समाधान थिटे, ग्रामसेवक निलेश पोटरे, आरोग्य सेविका उमा आतकरे, आशा वर्कर रुपाली क्षीरसागर, आरोग्य समुदाय अधिकारी श्वेता पवार यांनी परिश्रम घेतले.
फोटो
१२ नरखेड ०१
ओळी
बोपले ता. मोहोळ येथील ग्रामस्थांना लस देताना आराेग्य सेविका.