बार्शीत ५०० बेडचे बाल कोविड हॉस्पिटल उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:57+5:302021-05-16T04:20:57+5:30
भविष्यातील हा धोका ओळखून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक १५ मे रोजी ...
भविष्यातील हा धोका ओळखून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक १५ मे रोजी नगर परिषदेत घेतली. या बैठकीत सर्वांशी सल्लामसलत करून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन, एकमेकांच्या सोबतीने शहर व तालुक्यासाठी लवकरच बार्शी शहरात ०ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारणीचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शीतल बोपलकर, डॉ. जयवंत गुंड, डॉ. बी. वाय. यादव, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. सुनील पाटील, डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. हरीश कुलकर्णी, डॉ. अमित लाड, डॉ. आनंद मोरे, डॉ. जितेंद्र तळेकर, डॉ. अबिद पटेल, डॉ. विजयसिंह भातलवंडे, डॉ. स्वाती भातलवंडे, डॉ. युवराज रेवडकर, डॉ. रोहिणी कोकाटे, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.