अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्या; सोलापुरातील रिपाइंच्या मेळाव्यात ठराव

By Appasaheb.patil | Published: October 6, 2022 05:28 PM2022-10-06T17:28:33+5:302022-10-06T17:28:39+5:30

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात केला ठराव

50,000 per acre as compensation to farmers affected by excessive rainfall; Resolutions at the meeting of Ripai in Solapur | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्या; सोलापुरातील रिपाइंच्या मेळाव्यात ठराव

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्या; सोलापुरातील रिपाइंच्या मेळाव्यात ठराव

Next

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही अनेकांची पिके पाण्यातच आहेत. अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपये देण्याचा ठराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात करण्यात आला. याचवेळी अन्य १० ते १२ ठरावही करण्यात आले.

या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय खजिनदार रामराव दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे होते. प्रारंभी प्रास्ताविक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी केले.

याप्रसंगी डाॅ. सारीपुत्र तिपुरे, डाॅ. राजकुमार सोनवले, संजय गाडे, चंद्रकांत कांबळे, जलील भाई, इ. जा. तांबोळी, प्रा. सुहास उघडे, फारूक शेख, रियाज सय्यद आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

यावेळी जक्कापा कांबळे, दत्ता सावंत, विनोद धाहिजे, रावसाहेब प्रक्षाळे, राजाभाऊ लोंढे, गौस पिरजादे, इजाज शेख, रफिक शेख, सलीम मुल्ला, अखिलेश माने, आबुबकर करजगीकर, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समीर मुजावर, इरफान कलयाणी, महबूब पठाण, बोधी लालसरे, दयानंद वाघमारे, नसरीन शेख, अरुणा सरवदे, रेणुका सरवदे, प्रवीण म्हेत्रे, संदीप ससाणे यांच्यासह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांचन बनसोडे तर आभार सलीम शेख यांनी मानले.

-------------

मेळाव्यातील ठरावावर एक नजर..

  • - मुंबईतील दादर इंदू मिलच्या जागेवर होत असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे. रमाई आवास योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी.
  • - रेशन धान्य दुकानदारांमार्फत ग्राहकांना धान्य न देणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी.
  • - मागासवर्गीय वित्तीय महामंडळामार्फत कर्ज योजनेचा लाभ हा त्या घटकांना मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेला सक्ती करावी.
  • - संजय निराधार लाभार्थ्यांना दर महिन्याला रक्कम मिळावी
  • -जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणारे खोके त्यांना पर्यायी जागा दिल्याशिवाय हलवू नये

-----------

 

Web Title: 50,000 per acre as compensation to farmers affected by excessive rainfall; Resolutions at the meeting of Ripai in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.