न्यायालयातील क्लार्कसाठी ५० हजार मागितले; २० हजाराची लाच घेताना वकीलाला पकडले
By Appasaheb.patil | Published: December 11, 2023 08:00 PM2023-12-11T20:00:31+5:302023-12-11T20:01:24+5:30
महिला तक्रारदार याच्याविरूध्द सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे.
सोलापूर : न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयातील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून ४५ हजार लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हफ्ता २० हजार रूपये स्वीकारताना सोलापुरातील एका वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
दरम्यान, दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळी वस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) असे लाच स्वीकारलेल्या वकिलाचे नाव आहे. महिला तक्रारदार याच्याविरूध्द सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे. केसचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठी सह निबंधक को ऑप सोसायटी, पुणे येथील क्लार्क यांना ५० हजार द्यावे लागतील असे सांगून यातील तक्रारदाराचे वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार याच्याकडे ५० हजार लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरोधात सह निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी तेथील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून यापूर्वी घेतलेले ५ हजार वजा करून उर्वरित ४५ हजार रूपये लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हफ्ता २० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई सहा. पेालिस आयुक्त गणेश कुंभार, पेालिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पेालिस अंमलदार सोनवणे, पकाले, हाटखिळे, किणगी, सुरवसे याच्या पथकाने यशस्वी केली.