शेळगाव प्राथमिक शाळेसाठी शिक्षकांनी जमवले ५१ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:19+5:302021-09-06T04:26:19+5:30
वैराग : "स्वच्छ शाळा, सुंदर शाळा" या अभियानांतर्गत शेळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सुशोभीकरणासाठी ५१ हजारांचा निधी जमवून ...
वैराग : "स्वच्छ शाळा, सुंदर शाळा" या अभियानांतर्गत शेळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सुशोभीकरणासाठी ५१ हजारांचा निधी जमवून कमी असलेल्या बाबींची पूर्तता केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने मुख्याध्यापक हनुमंत सोनवणे, सहशिक्षक रंगनाथ काकडे, दीपक शेळके, दत्तात्रय सावंत, रुपाली बिडवे, वैशाली, अमिता क्षीरसागर, स्वाती चव्हाण, पल्लवी भालशंकर यांनी सहविचार सभा घेतली. या सभेत ५१ हजारांची देणगी जमा केली. ग्रामसेवक गोपाळ सुरवसे यांनी विंधन विहिरीस पुनर्भरण करून दिले. तसेच शौचालयाचा खड्डा घेऊन बांधकाम सुरू केले. याचबरोबर पालक श्याम शिरसाठ यांनी कपाट घेण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत केली.