५१८ मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:16 AM2021-06-18T04:16:16+5:302021-06-18T04:16:16+5:30
सांगोला तालुक्यात मान्सूनपूर्व (रोहिणी) व मृग नक्षत्राचा पाऊस दमदार झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीचे वेध लागले होते. यासाठी ...
सांगोला तालुक्यात मान्सूनपूर्व (रोहिणी) व मृग नक्षत्राचा पाऊस दमदार झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीचे वेध लागले होते. यासाठी यापूर्वी २० हजार ५७९ मेट्रिक टन रासायनिक खते कृषी केंद्रातून उपलब्ध करून दिली होती. मात्र शेतकऱ्यांकडून बी-बियाणांबरोबर रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. यामुळे १० दिवसांपासून सांगोला शहर व तालुक्यात कृषी केंद्रातून रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली होती.
सांगोला तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती तालुका कृषी कार्यालयाने तत्काळ नियोजन करून गुरुवारी तालुक्यातील १९ कृषी केंद्रांना ५१८ मेट्रिक टन रासायनिक खते वितरित केली असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारी यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::
खरीप हंगामासाठी सांगोला तालुक्यातील सांगोला ८४, महूद ९७, धायटी ४०, महिम ३०, वाकी-शिवणे ३०, कोळा ३०, कटफळ २० चिकमहूद २०, घेरडी ३५, उदनवाडी १२, जुनोनी २० सोनंद १५, जवळा १०, नाझरे २०, बलवडी १०, जुजारपूर १०, अकोला १०, कडलास १५, शिवणे १० अशी ५१८ मे. टन रसायनिक खते १९ कृषी केंद्रातून उपलब्ध केली आहेत.
- व्ही. के. काळुंखे
कृषी अधिकारी