५२ ग्रामपंचायतींना अंतिम मतदार यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:03+5:302020-12-14T04:35:03+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शुक्रवारी निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच स्थानिक पातळीवर गटातटांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
तालुक्यात ८३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल-डिसेंबर महिन्यादरम्यान संपली आहे. या ग्रामपंचायतींची निवडणूक तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी होऊन आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध कधी होणार, याकडे संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. सोमवारी १४ डिसेंबर रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
------
निवडणूक होणा-या ग्रामपंचायती
कुंभारी, शिंगडगाव, बोरूळ, इंगळगी, कणबस (ग), हणमगाव, होटगी स्टेशन, घोडातांडा, होटगी, सावतखेड, हिपळे, मद्रे, हत्तुर, यत्नाळ, फताटेवाडी, संजवाड, सिंदखेड, राजूर, संगदरी, मुस्ती, कर्देहल्ली, तीर्थ, लिंबीचिंचोळी, दिंडूर, वडगाव -शिरपनहळी, पिंजारवाडी, तांदूळवाडी, बोरामणी, वरळेगाव, बक्षीहिप्परगे, वडजी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, वडकबाळ, टाकळी, नांदणी, कुरघोट, बोळकवठे, बरुर, औराद, हत्तरसंग, माळकवठे, भंडारकवठे, कारकल, सादेपूर, लवंगी, बाळगी, येळेगाव, गुंजेगाव, वडापूर, अंत्रोळी, अकोले (म), तेलगाव (म)
----------
ग्रामपंचायतीची प्रशासकीय पातळीवर निवडणूक तयारी पूर्ण झाली आहे. मतदार यादीला घेतलेल्या हरकतींचा निपटारा करण्यात आला. सोमवारी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातूनच होणार आहे.
- अमोल कुंभार
तहसीलदार, दक्षिण सोलापूर