कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे धावल्या ५३ एस.टी गाड्या
By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 8, 2022 08:02 PM2022-12-08T20:02:58+5:302022-12-08T20:03:36+5:30
कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे ५३ एस.टी गाड्या धावल्या.
सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला असून, यापार्श्वभूमीवर कर्नाटककडे जाणाऱ्या एस.टी. गाड्यांचा मार्ग बुधवारी दुपारी रोखण्यात आला होता. अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या नऊ एस.टी. गाड्यांचा मार्ग रोखल्याने प्रवाशांची अडचण झाली. गुरुवारी दुपारी कर्नाटक पोलिसांनी गाड्या पाठवण्याबाबत होकार दिल्यानंतर अक्कलकोट बस डेपोतून २१ तसेच इतर ठिकाणाहून आलेल्या ३२ असे एकूण ५३ गाड्या सोलापुरातून कलबुर्गीकडे धावल्या.
दुपार नंतर साधारण पाच गाड्या अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे धावल्या. गाड्यांचे नूकसान होईल, याभीतीने बुधवारी एकाकी गाड्यांचा मार्ग रोखण्यात आला. गाड्यांबाबत कर्नाटक पोलिसांनी सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी गाड्या पुन्हा सुरु झाल्या. अक्कलकोट बस डेपोतून रोज साधारण ६० गाड्या कर्नाटककडे धावतात.