बेफिकीर नागरिकांकडून ५.३५ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:41+5:302020-12-15T04:38:41+5:30
अनेक नागरिक फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याचे टाळत आहेत. अशा नागरिकांवर आणखी कडक कारवाई करण्याचे संकेत पोनि. भगवानराव निंबाळकर यांनी ...
अनेक नागरिक फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याचे टाळत आहेत. अशा नागरिकांवर आणखी कडक कारवाई करण्याचे संकेत पोनि. भगवानराव निंबाळकर यांनी दिले आहेत. मास्क न वापरणे, दोनचाकी वाहनावर तीन-चार जणांनी प्रवास करणे, चारचाकीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजाचा हाॕॅर्न बसवणे, नियमबाह्य नंबर प्लेट लावणे अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच फटाक्यांसारखा आवाज काढून नागरिकांना घाबरवणाऱ्या बुलेटस्वारांनाही फटके देणे सुरू करणार असल्याचे पोनि. भगवानराव निंबाळकर यांनी सांगितले.
यांच्याकडून केली दंडाची वसुली
मागील पाच महिन्यांत मास्क न वापरणाऱ्या ३०५१ जणांकडून ४ लाख १२ हजार ७०० रुपये, दुचाकीवरून दोघांनी प्रवास करणाऱ्या ७६ जणांकडून ३८ हजार, दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे ५०० रुपये, चारचाकीतून तीनपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या १३ जणांकडून ११ हजार ५०० रुपये, निर्धारित वेळेनंतर दुकाने चालू ठेवणाऱ्या १७ जणांकडून १७ हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ११९ जणांकडून २३ हजार ८००, फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्या ३१८ जणांकडून ३१ हजार ८०० रुपये असा ५ लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई पोना हनुमंत झिंजे, विलास वाघमोहे, पोकाँ सोमनाथ बोराटे, पोकाँ. निशांत सावजी यांनी केली.
----