सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद

By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 9, 2023 06:52 PM2023-03-09T18:52:00+5:302023-03-09T18:52:39+5:30

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 

 55 crores has been allocated in the budget for examination hall of Solapur University | सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनसाठी अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद

googlenewsNext

सोलापूर: राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी ५५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी याचे स्वागत केले असून राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले आहे.

परीक्षा भवन अन् नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ५५ कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. याबाबत २०१९ साली राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. तसेच राज्य शासनाने सोलापूर विद्यापीठाने कौशल्य विकास योजनेत भरीव कामगिरी केली असून या कामाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. कामाची माहिती शासनाने मागवली आहे, असे डॉ. फडणवीस यांनी सांगितले.


 

Web Title:  55 crores has been allocated in the budget for examination hall of Solapur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.