५५ दिवस उलटले, तरी चोरीचा तपास लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:52+5:302021-05-29T04:17:52+5:30
महूद-दिघंची रोडवरील शैलेश गांधी यांच्या घरातून ३ बुरखाधारी चोरट्यांनी शैलेश रेडिमेड अँड स्टेशनरी या दुकानाच्या मागील बाजूने घरात जाणे-येण्यासाठी ...
महूद-दिघंची रोडवरील शैलेश गांधी यांच्या घरातून ३ बुरखाधारी चोरट्यांनी शैलेश रेडिमेड अँड स्टेशनरी या दुकानाच्या मागील बाजूने घरात जाणे-येण्यासाठी असलेल्या सेफ्टी दरवाजाच्या खिडकीचे गज कटरने कापून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटाचे लाॅक तोडून ६ तोळ्यांच्या ४ बांगड्या, ६ तोळ्यांचे २ कंगन, ६ तोळ्यांच्या २ पाटल्या, ४ तोळ्यांची बांगडी, ८ तोळ्यांचे २ मंगळसूत्र, ३ तोळ्यांचा राणी हार, ६ तोळ्यांचा नेकलेस, ४ तोळ्यांचा सोन्याचा चोकर, ३ तोळ्यांचे नेकलेस, २ तोळ्यांच्या ५ लेडिज अंगठ्या, १ तोळ्याची लेडिज चैन व ५ ग्रॅमप्रमाणे २ तोळ्यांची कर्णफुले असे सुमारे २० लाख ४० हजार किमतीचे ५१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख १ लाख असा २१ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून लंपास केली होता. याबाबत शैलेश नंदकुमार गांधी यांनी फिर्याद दाखल केली होती.
यापूर्वी महूद बँक ऑफ महाराष्ट्र, सराफ दुकान, ग्राहकाच्या डिकीतून बँकेसमोरून रोकड लांबविणे, मेडिकल दुकान फोडणे, बँक ऑफ महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडणे, यासह गावातील अनेक चोऱ्यांचा तपास पोलिसांकडून आजपावेतो झाला नाही. त्यामुळे शैलेश गांधी यांच्या बंगल्यातील चोरीचा तपास लागणार की गुंडाळणार, असा ग्रामस्थांचा सूर आहे.
कोट ::::::::::::::
शैलेश गांधी यांच्या बंगल्यातील धाडसी चोरीचा तपास योग्य दिशेने सुरू असून, तो अंतिम टप्प्यात आहे. लवकरच चोरीचा छडा लावला जाईल.
- संदेश नाळे, तपास अधिकारी