पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी थकविले ८८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:56 AM2018-12-12T11:56:49+5:302018-12-12T11:58:32+5:30

आरआरसीनुसार कारवाईस पात्र : नऊ कारखान्यांनी दिली २१ टक्के एफआरपीनुसार रक्कम

55 sugar factories in Pune division have been tired of Rs 885 crore | पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी थकविले ८८५ कोटी

पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी थकविले ८८५ कोटी

Next
ठळक मुद्देपुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांकडे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्याचे ८८४ कोटी ९२ लाख रुपये एफआरपी (रास्त किफायतशीर दर) नुसार थकले आहेत. यापैकी ९ कारखान्यांनी एफआरपीनुसार २१ टक्के रक्कम दिली आहे. हे सर्व ५५ साखर कारखाने आरआरसी (महसुली वसुली दाखला) नुसार कारवाईस पात्र ठरले आहेत.

पुणे सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी विभागातील तीन जिल्ह्यातील ऊस गाळपाचा आढावा ५ डिसेंबर रोजी घेतला. साखर कारखान्याकडून एक ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील झालेले गाळप, पडलेला साखर उतारा, एफआरपीनुसार शेतकºयांची देय रक्कम, दिलेली रक्कम व द्यावयाची राहिलेली रक्कम याची माहिती घेतली. गाळप सुरू केलेल्या ५५ साखर कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील १२, पुणे जिल्ह्यातील १७ व सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या माहितीनुसार एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे विभागातील ५५ साखर कारखान्यांनी ४५ लाख ९५ हजार २०० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. यापैकी ९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या २१ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. ऊस गाळपाला आणल्यानंतर किमान १४ दिवसांत शेतकºयांची एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र पुणे विभागातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम शेतकºयांना दिली नाही.
सहसचांलक पुणे यासंदर्भात तयार केलेल्या पत्रात वरील माहिती दिली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे कारवाई संदर्भात निर्णय घेणार आहेत.

सहकार मंत्र्यांचे कारखाने बंदच..

  • - सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी सिद्धेश्वर कुमठे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लोकमंगल बीबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे हे कारखाने अद्यापही साखर आयुक्त कार्यालयाकडे बंद आहेत. मकाई व मातोश्री लक्ष्मी शुगर हे कारखाने नोव्हेंबरच्या दुसºया पंधरवड्यात सुरू झाले आहेत. 
  • - ५५ कारखान्यांनी एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीचे एफआरपीनुसार १११७ कोटी २१ लाख देणे असून, २३२ कोटी २९ लाख रुपये दिले तर ८८४ कोटी ९२ लाख रुपये थकबाकी आहे.
  • - पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम कारखान्याने १४ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये. विघ्नहार कारखान्याने २८ कोटी रुपये दिले आहेत.
  • - सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने  एफआरपीच्या ८३ टक्के रक्कम दिली आहे. ‘पांडुरंग’ श्रीपूरने  एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम दिली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याने   एफआरपीच्या ७७ टक्के रक्कम दिली आहे.
  • - विठ्ठलराव शिंदे कारखान्याने  ८३ टक्के एफआरपी दिली आहे. लोकनेते कारखान्याने  ८१ टक्के एफआरपी दिली आहे. सासवड माळीने  २८ टक्केच एफआरपी दिली. जय हिंद कारखान्याने  एफआरपीच्या २५ टक्के इतकीच रक्कम दिली आहे. 

Web Title: 55 sugar factories in Pune division have been tired of Rs 885 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.