आंबे-पोहरगाव येथे ६ बोटी नष्ट; २० ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:44+5:302021-06-24T04:16:44+5:30
तालुक्यातील मौजे आंबे व मौजे पोहरगावदरम्यानच्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. याची माहिती मिळताच तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी ...
तालुक्यातील मौजे आंबे व मौजे पोहरगावदरम्यानच्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. याची माहिती मिळताच तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी स्पीड बोटचा वापर करत नदीच्या पलीकडे आंबे येथे पोहोचले. तेथे बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले. अधिक पाहणी केली असता नदीपात्राबाहेर काठाला १ लाख रुपये किंमतीचा २० ब्रास वाळूचा साठा केलेला आढळून आला. वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटी नष्ट करण्यात आल्या. तसेच वीस ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. सदर शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे पाठवण्यात आला.
ही कारवाई तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडळ अधिकारी संतोष सुरवसे, गणेश टिके, समीर मुजावर, रणजित मोरे यांच्यासह तलाठी आणि कोतवाल यांच्या पथकाने केली.
----
फोटो :२३पंढरपूर, २३पंढरपूर १