दररोज ६ हजार कि.मी. धावतेय एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:18+5:302021-06-16T04:30:18+5:30

गेल्या शनिवारपासून दररोज प्रवासी चढ-उतार संख्या वाढू लागली. सांगोला आगारातून शनिवार रविवारी व सोमवार दररोज १७ बस ...

6 thousand km per day. Running ST | दररोज ६ हजार कि.मी. धावतेय एसटी

दररोज ६ हजार कि.मी. धावतेय एसटी

Next

गेल्या शनिवारपासून दररोज प्रवासी चढ-उतार संख्या वाढू लागली. सांगोला आगारातून शनिवार रविवारी व सोमवार दररोज १७ बस २२ ते २३ रुपये प्रति कि.मी.प्रमाणे १२६ फेऱ्यांतून ६ हजार किमी धावल्या. त्यामधून आसन क्षमतेनुसार प्रवाशांच्या चढ-उतारामधून सुमारे ४.५ लाख रुपयांचे डिझेलपुरते उत्पन्न मिळत आहे. सोमवारपासून सांगोला आगारातून मुंबई, पुणे, सोलापूर, आटपाडी, जत, मंगळवेढा, पंढरपूर, अकलूज या मार्गावर प्रत्येक तासाला बस धावू लागल्या आहेत. प्रवाशांनी एस.टी.च्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला आगारातर्फे केली आहे.

कोट ::::::::::::::::::

सध्या लोकांच्या मनात अजूनही कोरोनाविषयी भीती असल्यामुळे एस.टी.ला ५० टक्के प्रतिसाद मिळतोय. २० जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे संकेत मिळतात. शहरातील शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात एस.टी.च्या फेऱ्या सुरू केल्या जातील. प्रवासी प्रतिसादाअभावी ग्रामीण भागात एस.टी.ची सेवा बंदच आहे.

- पांडुरंग शिकारे

आगारप्रमुख

Web Title: 6 thousand km per day. Running ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.