तुडुंब गर्दीत भरले ६०३ उमेदवारांनी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:45+5:302020-12-31T04:22:45+5:30
करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचामाळ, वडगाव, पुनवर, देवळाली, बोरगाव, बिटरगाव ,पोथरे, भोसे, रोशेवाडी, जातेगाव, पिंपळवाडी, सावडी, उम्रड, शेटफळ, कुगाव, केडगाव, अर्जुननगर, ...
करमाळा तालुक्यातील श्रीदेवीचामाळ, वडगाव, पुनवर, देवळाली, बोरगाव, बिटरगाव ,पोथरे, भोसे, रोशेवाडी, जातेगाव, पिंपळवाडी, सावडी, उम्रड, शेटफळ, कुगाव, केडगाव, अर्जुननगर, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पोटेगाव, बाळेवाडी, घारगाव, फिसरे, करंजे, कोळगाव, दिलमेश्वर, कुंभेज, सरपडोह, गूळसडी, ढोकरी, जेऊरवाडी, कोंढेज, झरे, शेलगाव-क, सौंदे, हिवरे, निमगाव, साडे, सालसे, आळसुंदे, नेरले, हिसरे, पांगरे, पाथुर्डी, सांगवी, मलवडी, कविटगाव, हिवरवाडी, मांगी, आळजापूर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत आमदार संजयमामा शिंदे, माजी आ. नारायण पाटील, माजी आ. जगताप व बागल हे चार ही गट स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकासमोर उतरले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालय आवारात उमेदवार व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ऑनलाइन सर्व्हर डाऊन होत असल्याने निवडणूक आयोगाने छापील उमेदवारी अर्ज उपलब्ध करून दिली. उमेदवारी अर्ज ऑफलाइन दाखल करण्यासाठी पाच वाजण्याची वेळ दिली. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला.
फोटो ओळी : ३०करमाळा- ग्रामपंचायत
करमाळा तहसील कार्यालय आवारात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची झालेली गर्दी.
-----