वर्षभरात सोलापुरातील १४९६ गुन्ह्यांपैकी ६०८ उघडकीस; ९० सावकारांवरही कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:25 PM2021-08-10T18:25:12+5:302021-08-10T18:25:19+5:30

सोलापूर शहर पोलिस दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची माहिती

608 out of 1496 crimes detected in Solapur during the year; Action against 90 lenders too! | वर्षभरात सोलापुरातील १४९६ गुन्ह्यांपैकी ६०८ उघडकीस; ९० सावकारांवरही कारवाई !

वर्षभरात सोलापुरातील १४९६ गुन्ह्यांपैकी ६०८ उघडकीस; ९० सावकारांवरही कारवाई !

Next

सोलापूर : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी २०२०-२०२१ या सालात एक हजार ४९२ गंभीर गुन्हे झाले असून, ६०८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. सावकाराविरुद्ध घेण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान ९० गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये ९७ सावकारांवर कारवाई केली आहे. मध्ये एकूण आठ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, दीपाली धाटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, त्यांनी यंदाचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तालयाच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायंकाळी ४ नंतर लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरवर्षी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, सामाजिक संघटनांच्या मदतीने उपक्रम राबविले जातात. मात्र २०२० मध्ये कोरोनामुळे वर्धापन साध्या पद्धतीने साजरा केला होता. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने १० ऑगस्ट रोजी होणारा वर्धापनदिन साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, असे म्हणाले. जागा प्लॅट फसवणूक प्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये ११६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. जुगारा संदर्भात ३७२ गुन्हे दाखल झाले असून, एक हजार ६७६ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

तीन वर्षांत २२ लोकांवर एमपीडीएची कारवाई

  • ० शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या तीन वर्षांत २८ गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
  • ० गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी तडीपारचे ९४ प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यात १८२ गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई झाली आहे.
  • ० शहर वाहतूक शाखेच्या वतीने २०१९ ते २०२१ दरम्यान तीन लाख ३५ हजार ८८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांकडून ११ कोटी सहा लाख ६८ हजार ६५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
  • ० कोरोना संसर्ग कालावधीत नियमांचा भंग करणाऱ्या ५०३० गुन्हे दाखल करण्यात आले असून, ११ हजार ४३९ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • ० आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ठेवीदारांच्या २५ कोटी ४५ लाख ५८ हजार ३१९ रुपये किमतीच्या मालमत्ता संरक्षित करण्यात आल्या आहेत.

Web Title: 608 out of 1496 crimes detected in Solapur during the year; Action against 90 lenders too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.