सोलापूरात पाच महिन्यात ६११ गुन्हे, ४७४ जणांना केली अटक
By admin | Published: September 16, 2016 04:22 PM2016-09-16T16:22:29+5:302016-09-16T16:22:29+5:30
पाच महिन्यात ६९१ जणांवर गुन्हे दाखल करून ४७४ जणांना अटक केली आहे़ या कारवाईत १ कोटी ६१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
Next
>आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. 16 - परराज्यातील दारू, बनावट दारू, हातभट्टी दारू, अवैध स्पिरीट, अल्कोहोल, मळी, काळागुळ याशिवाय अवैध चोरटी वाहतुक, निर्मिती व विक्री केंद्रावर कारवाई करून पाच महिन्यात ६९१ जणांवर गुन्हे दाखल करून ४७४ जणांना अटक केली आहे़ या कारवाईत १ कोटी ६१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी चालणाºया अवैध दारू निर्मिती करणाºया धंद्यावर धाड टाकून ही कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्यातील प्रमुख महसुल उत्पन्नापैकी एक महसुल मिळवून देणारा विभाग असून महसुल गोळा करण्याबरोबरच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अवैध दारू विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येते़ राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी एप्रिल २०१६ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६९१ गुन्हे दाखल केले असून ४७४ आरोपींना अटक केली आहे़ यात १ कोटी ६१ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
तक्रारीची वरिष्ठ पातळीवर घेणार दखल़
अवैध दारूविरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने नागरिकांचा अवैध दारूबाबत तक्रार नोंदविता यावी याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन हॉटसअप नंबर सुरू केला आहे़ हा नंबर राज्य स्तरावरून उपलब्ध होणार असून संबंधित क्रमांकावर केलेली तक्रार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे नोंद होणार असून वरिष्ठ पातळीवर सदर तक्रारीची दखल घेतली जाणार आहे़
लेखी, चित्रफिती, संदेश,व्हिडिओव्दारे तक्रार नोंदविणार
अवैध दारू विरोधात नागरिकांची तक्रार असल्यास ८४२२००११३३ या व्हाटस अप क्रमांकावर संदेशाव्दारे, लेखी स्वरूपात, फोटो अथवा व्हिडिओ चित्रफीतीच्या स्वरूपात पाठवावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूर अधिक्षक सागर धोमकर यांनी केले आहे़ तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे़