२ वर्षांत ६१७९४ शेती वीजजोडण्या; ३० मीटर अंतरातील शेतीपंपाना तात्काळ जोडणी

By Appasaheb.patil | Published: March 24, 2023 03:03 PM2023-03-24T15:03:30+5:302023-03-24T15:04:15+5:30

शेतीपंपाच्या जोडणी करिता एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते.

61794 farm electrification in 2 years; Instant connection to farm pumps within 30 meters | २ वर्षांत ६१७९४ शेती वीजजोडण्या; ३० मीटर अंतरातील शेतीपंपाना तात्काळ जोडणी

२ वर्षांत ६१७९४ शेती वीजजोडण्या; ३० मीटर अंतरातील शेतीपंपाना तात्काळ जोडणी

googlenewsNext

सोलापूर - गेल्या दोन वर्षांत महावितरण बारामती परिमंडलाने शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. ३० मीटर अंतरातील प्रतिक्षा यादी जवळपास संपली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करुन कोटेशन भरावे अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत कनेक्शन देण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत. 

शेतीपंपाच्या जोडणी करिता एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ह्या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले. या धोरणानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली त्यातील ३३ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’ गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध झाला. त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.

दरम्यान, अंतरानुसार प्रलंबित जोडण्याची संख्या पाहिली असता ३० मीटरच्या आतील ५० हजार ३१३ जोडण्यांपैकी ५० हजार ८९ जोडण्या आज रोजी दिल्या आहेत. ३१ ते २०० मीटर अंतरातील १२ हजार १६० पैकी ९२६२ तर २०१ ते ६०० मीटरपर्यंतच्या ७५१० पैकी २३२४ जोडण्या दिल्या आहेत. याशिवाय ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ११९ शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे काम महावितरण बारामती परिमंडलाने केले आहे. तसेच उर्वरित जोडण्या देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.

Web Title: 61794 farm electrification in 2 years; Instant connection to farm pumps within 30 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.