१८३७ लाभार्थ्यांकडे ६७ लाख ८८ हजार येणेबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:58+5:302021-02-05T06:48:58+5:30
पीएम किसान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक ४ महिन्यांनी २ हजार रुपयांप्रमाणे वार्षिक ...
पीएम किसान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक ४ महिन्यांनी २ हजार रुपयांप्रमाणे वार्षिक ६ हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते. या लाभार्थ्यांमध्ये सांगोला तालुक्यातील १५६५ करदात्यांनी १ कोटी ५४ लाख ४४ हजार रुपयांचा तर एकाच कुटुंबातील अनेकांनी लाभ घेतला आहे, अशा २७२ लाभार्थ्यांनी १२ लाख ६ हजार रुपयांचा लाभ घेतला घेतल्याचे निदर्शनास आले आहे. महसूल विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा बजावून रक्कम भरा अथवा सक्त वसुलीच्या कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला होता.
करदात्या १५६५ तर अपात्र २७२ जणांचा समावेश
आयकर भरणाऱ्या १५६५ लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेचा १ कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांचा लाभ घेतलेल्यांपैकी ९८ लाख ६२ हजार रुपये वसूल केले आहेत. अद्यापही ६७ लाख ८८ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहेत. अपात्र २७२ लाभार्थ्यांनी १२ लाख ६ हजार रुपयांचा लाभ घेतला असून ६ लाख १२ हजार रुपये शासनाकडे जमा केले आहेत. अद्यापही ५ लाख ९४ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. आतापर्यंत ५१५ खातेदारांनी ४० लाख ६५ हजार रुपये जमा केल्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.