अक्कलकोट तालुक्यातील ६८ शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:46+5:302021-07-14T04:25:46+5:30
अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी ही तीन नगरपालिका क्षेत्रे वगळून ८ वी ते १२ वी वर्गाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३५, ...
अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी ही तीन नगरपालिका क्षेत्रे वगळून ८ वी ते १२ वी वर्गाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३५, तर माध्यमिक ४२ शाळा आहेत. शासनाने एक महिन्यापासून ज्या गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही अशा गावातील शाळा कोरोना नियमांचे पालन करीत सुरू करण्यास हरकत नसल्याचा आदेश काढण्यात आला. त्यानुसार स्थानिक ग्रामपंचायत, समितीचे ठराव घेऊन एका डेस्कवर एक विद्यार्थी बसवून सॅनिटायझर, मास्क, शारीरिक अंतर अशा सर्व नियमांचे पालन करीत सोमवारी १२ जुलै रोजी शाळा सुरू करण्यात आल्या.
यासाठी सोमवारी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, भीमराव धडके, आशा नडगिरे, बापूराव चव्हाण, शिवाजी शिंदे, देवीदास वाघमोडे, हरिश्चंद्र गायकवाड यांनी आपापल्या हद्दीतील शाळेत भेट देऊन नियमांचे पालन करत शाळा सुरू केल्या.
----