पूरहानी दुरुस्तीअंतर्गत ७ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:10+5:302021-03-15T04:21:10+5:30

यामध्ये जिल्हा हद्द दिघंची-खवासपूर-लोटेवाडी-एखतपूर-सांगोला रस्त्यावरील सेतू पुलाची दुरुस्तीसाठी ३० लाख, रामा १६६ ते हतीद-मानेगाव-जवळे घेरडी ते बाळू मान्याचीवाडी ते ...

7 crore 19 lakhs sanctioned under flood repair | पूरहानी दुरुस्तीअंतर्गत ७ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

पूरहानी दुरुस्तीअंतर्गत ७ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर

Next

यामध्ये जिल्हा हद्द दिघंची-खवासपूर-लोटेवाडी-एखतपूर-सांगोला रस्त्यावरील सेतू पुलाची दुरुस्तीसाठी ३० लाख, रामा १६६ ते हतीद-मानेगाव-जवळे घेरडी ते बाळू मान्याचीवाडी ते हुन्नुर-मारोळी-लवंगी-शिवनगी रामा ५१६ अ ला मिळणाऱ्या राज्यमार्गावरील सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी ५ लाख, मंगळवेढा-पारे-जत -बिळूर रस्ता दुरुस्ती व सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी ६० लाख, अजनाळे-यलमार मंगेवाडी-वाटंबरे-राजुरी-हटकर मंगेवाडी-जुजारपूर-जुनोनी-कोळा रस्त्यावरील सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी ५३ लाख, रामा ९ ते हिवरे-कोन्हेरी-पेनूर-येवती-मेंढापूर-भोसे-पटवर्धन कुरोली, भाळवणी-महिम ते महुद बु. रस्ता व सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी, वाटंबरे-अकोला-कडलास-जवळे-भोपसेवाडी-डिकसळ-नरळे ते जिल्हा हद्द रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २५ लाख, वाढेगाव-कडलास-निजामपूर-राजुरी-उदनवाडी-पाचेगाव खुर्द-सोमेवाडी-शेटफळ जिल्हा हद्द रस्ता व सेतू पूल दुरुस्तीसाठी ६५ लाख, नाझरे-चोपडी-कोळा रस्ता दुरुस्तीसाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

भाळवणी गटातील कौठाळी-खेडभाळवणी-शेळवे-वाडीकुरोली रस्ता व सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३० लाख, रामा १४३ ते लोणारवाडी-गार्डी रस्ता व सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी २० लाख, रामा १४१ ते सुपली-पळशी रस्ता व सेतू पुलाच्या दुरुस्तीसाठी ६ लाख, भंडीशेगाव-उपरी-तिसंगी-सोनके-उंबरगाव-शिरभावी-चिंचोली ते सांगोला मोरीच्या दुरुस्तीसाठी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन सर्व कामे लवकरच पूर्ण होतील, असे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Web Title: 7 crore 19 lakhs sanctioned under flood repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.