अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:25 AM2023-08-19T06:25:49+5:302023-08-19T06:26:28+5:30

महिनाभराच्या काळात मंदिर समितीला विविध माध्यमांतून ७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. 

7 Crore income to vitthal rukmini temple pandharpur in adhik maas 11 lakh devotees took darshan | अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : अधिक श्रावण महिन्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, भाविकांनी मंदिर समितीला ७ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. 

या कालावधीत ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पदस्पर्श दर्शन व सुमारे ५ लाख भाविकांनी मुखदर्शन घेतले. नित्यपूजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र, देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा इत्यादी माध्यमांतून हे उत्पन्न मिळालेले आहे. महिनाभराच्या काळात मंदिर समितीला विविध माध्यमांतून ७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. 

२०१८ मध्ये २ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यावर्षीच्या अधिक मासाच्या उत्पन्नात ४ कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा

अधिक मासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून, २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किमतीचे सोने व ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झाल्या असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.


 

Web Title: 7 Crore income to vitthal rukmini temple pandharpur in adhik maas 11 lakh devotees took darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.