ग्रामीण भागात नवे ७ रूग्ण; वळसंग, अकलूज, मोहोळ, मुळेगांव, अक्कलकोटमधील रूग्णांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:22 PM2020-06-12T17:22:17+5:302020-06-12T17:23:55+5:30
कोरोनाचे रूग्ण वाढले; ७१ रूग्णांवर उपचार, ३३ रूग्णांनी केली कोरोनावर मात
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली आहे. शुक्रवारी नवे ७ रूग्ण कोरोनाचे आढळले. यात वळसंग, अकलूज, मोहोळ, मुळेगांव, अक्कलकोट, नवीन विडी घरकुलमधील रूग्णांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ११० कोरोना बाधित आढळून आले. त्यापैकी आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७१ रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू असून ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शुक्रवारी आढळून आलेले रूग्ण पुढीलप्रमाण
- सुमित्रा नगर, अकलूज, ता. माळशिरस
- पारधी वस्ती, मुळेगांव, ता. दक्षिण सोलापूर
- वळसंग ता. दक्षिण सोलापूर
- मौलाली गल्ली, अक्कलकोट
- नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर
-सोहाळे, ता. मोहोळ