१८८० पासूनचे सातबारा फेरफार उतारे दिसणार; सध्या १९ जिल्ह्यांत ऑनलाइन रेकॉर्ड उपलब्ध

By संताजी शिंदे | Published: July 31, 2023 01:38 PM2023-07-31T13:38:50+5:302023-07-31T13:39:45+5:30

सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटले, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे.

7/12 modified excerpts from 1880 will be appear; Currently, online records are available in 19 districts | १८८० पासूनचे सातबारा फेरफार उतारे दिसणार; सध्या १९ जिल्ह्यांत ऑनलाइन रेकॉर्ड उपलब्ध

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

सोलापूर : ब्रिटिश काळापासूनचे जिल्ह्यातील १८८० सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उताऱ्यांचे रेकॉर्ड स्कॅन करून ठेवण्यात आले आहे. हे रेकॉर्ड ऑनलाइनवर लवकरच ते प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटले, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो रुपये मोजूनही खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. खरेदीपूर्वी मूळ जमीन कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेतिहास मिळवण्यात अडचणी येत होत्या. आता काही जिल्ह्यांमध्ये ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जिल्ह्यांत व्यवस्था
मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील १८८० पासूनचे रेकॉर्ड सध्या ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. उर्वरित १७ जिल्ह्यांत स्कॅनिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच येथे फेरफार उतारे दिसतील.
 

Web Title: 7/12 modified excerpts from 1880 will be appear; Currently, online records are available in 19 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.