७२ टक्के सोलापूरकर म्हणाले, उठा-बशाची शिक्षा योग्यच; काही जणांनी दाखविला पालिका कर्मचाºयांचाही तोबरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:58 AM2019-01-24T10:58:53+5:302019-01-24T11:00:05+5:30
सोलापूर : महापालिका इंद्रभवन इमारतीच्या परिसरात थुंकणाºया युवकाला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उठा-बशा काढण्याची शिक्षा ठोठावणे योग्य आहे, ...
सोलापूर : महापालिका इंद्रभवन इमारतीच्या परिसरात थुंकणाºया युवकाला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उठा-बशा काढण्याची शिक्षा ठोठावणे योग्य आहे, असे मत बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत १२४७ पैकी ८९७ सोलापूरकरांनी नोंदविले आहे. उर्वरित ३५० जणांपैकी काही जणांनी केवळ दंडात्मक कारवाई करायला हवी होती, असे म्हटले आहे. तर काही जणांनी कारवाईच करायला नको होती, असे मत नोंदविले आहे.
महापालिका इंद्रभुवन इमारत परिसरात मंगळवारी सायंकाळी एक कार्यकर्ता थुंकत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास आले होते. आयुक्तांनी त्याला १५० रुपये दंड करण्याचे आदेश दिले. त्याला उठा-बशा काढण्यास सांगितले. हे पाहून बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आयुक्त डॉ. ढाकणे यांच्याशी हुज्जत घातली. दंड करा, पण उठा-बशा काढायला सांगू नका. महापालिकेचे अनेक कर्मचारी गुटखा खाऊन येतात. त्यांच्यावर प्रथम कारवाई करा, असे म्हटले होते.
आयुक्त डॉ. ढाकणे यांनी त्या कार्यकर्त्याला उठा-बशा काढायला लावणे योग्य होते का? असा प्रश्न बुधवारी ‘लोकमत’ने सोलापूरकरांना विचारला होता.
सोलापूरकरांनी ‘एस किंवा नो’ या शब्दांत आपली मते नोंदवायची होती. सकाळी सहापासून सोलापूरकरांनी व्हॉट्सअॅप आणि टेक्स्ट मेसेजद्वारे आपली मते नोंदविली. रात्रीपर्यंत १२४७ जणांचे मेसेज आले. यातील ८९७जणांनी एस म्हणजे आयुक्तांची भूमिका योग्य होती, असे मत नोंदविले आहे तर ३५० जणांनी नो असे मत नोंदवून आयुक्तांची भूमिका योग्य नसल्याचे सांगितले आहे. सोलापूरकरांनी काही प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
सौदी अरेबियातूनही आली प्रतिक्रिया
सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये राहणाºया वाचकाने ई-पेपरवरील बातमी वाचून आयुक्तांची भूमिका योग्य असल्याचे कळविले आहे. हा वाचक मूळचा सोलापूरचा असून, खात्रीसाठी त्याने व्हॉट्सअॅपवर आपले लोकेशनही पाठविले आहे.
- - चंदनशिवे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती... आयुक्त म्हणजे न्यायाधीश नाहीत...
- - शहराला स्मार्ट करण्यासाठी हे गरजेचे आहे.
- - नगरसेवक चंदनशिवे यांना ५०० रुपये दंड करावा.
- - लोकप्रतिनिधींनी चुकीच्या गोष्टीचे समर्थन करू नये.
- - थुंकणारी व्यक्ती आढळल्यास त्याला शर्ट काढून पुसायला लावलं पाहिजे. महापालिकेच्या अधिकाºयांना हीच शिक्षा करावी. ढाकणे यांनी अधिकाºयांच्या खिडक्यासुद्धा पाहाव्यात.
- - रस्त्यावर थुंकणारी प्रवृत्ती सोलापुरातच जास्त आहे. त्यांनी या पद्धतीने दंड केला तरच जरब बसेल.
- - चंदनशिवे यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते.
- - शिस्त, स्वच्छता आणि पारदर्शकता हे सोलापूरसाठी खूप महत्त्वाचे आहे.
- - चाबकाचे फटके द्यायला पाहिजे. सोलापुरात बसायला एकही जागा राहिलेली नाही.
‘नो’ म्हणणाºया
सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया
- - ही लोकशाही आहे, हिटलरशाही नाही.
- -आयुक्त हे न्यायाधीश नाहीत. त्यांना अशी शिक्षा देण्याचा अधिकार नाही. उठा-बशा काढायला लावणे कोणत्या कायद्यात बसते.
- स्मार्ट, स्वच्छ सोलापूरचा कारभार ज्या इमारतीतून चालतो, तिथेच पिचकाºया उडालेल्या असतात. ही कसली स्मार्ट विचारसरणी
युवती म्हणाल्या, तरच हे लोक सुधारतील
- विशेष म्हणजे युवती आणि महिलांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. शहरात आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेकदा रस्त्यावर थुंकणाºयांचा त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी किळसवाणे चित्र पाहायला मिळते. त्या लोकांना अशाप्रकारची शिक्षा झालीच पाहिजे. त्या शिवाय ते सुधारणार नाहीत. महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई सुरू करावी, असेही युवतींनी कळविले आहे.