७५ वर्षीय आजोबा, ७० वर्षीय आज्जीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:21+5:302021-05-18T04:23:21+5:30
शेतात काम करणारे महादेव सरगर व उमा सरगर दाम्पत्य अनेक संकटांचा सामना करीत आहे. चार वर्षांपूर्वी आजाराने तरुण मुलगा ...
शेतात काम करणारे महादेव सरगर व उमा सरगर दाम्पत्य अनेक संकटांचा सामना करीत आहे. चार वर्षांपूर्वी आजाराने तरुण मुलगा गमावला, मुली माहेरी गेल्या. त्यामुळे सध्या दोघेच एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. असे असतानाच कोरोना महामारीने गाठले अन् पाडव्याच्या सणादिवशी सरगर यांचा स्कोअर १७ असल्याचे सिद्ध झाले. याशिवाय रक्तदाब असल्याने उपचार व देखभालीसाठी कोणीच नसल्यामुळे त्यांनी घरी राहाणे पसंत केले. मात्र, जास्त त्रास झाल्यामुळे अखेर माळशिरस ग्रामीण रुग्णालयात दोघांनी उपचार घेतले. आठवडाभरातच ते बरे होऊन घरी परतले. सध्या त्यांच्या पुढील पोटापाण्याची समस्या अद्याप कायम आहे. त्यांनी कोरोनासारख्या असाध्य आजाराला हरवल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
देव अन् देवमाणसांमुळे वाचलो
कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर शेजारी - पाजारी व इतरांनी आमच्याजवळ येणे टाळले. मात्र, आम्ही हतबल न होता
आर्थिक व इतर कोणत्याही परिस्थितीत आम्हाला दवाखान्यात जाणे परवडणारे नव्हते. यावेळी जवळच्या नातेवाईकांनी आधार दिला. याबरोबरच नगरसेवक संतोष वाघमोडे व त्यांच्या साथीदारांना परमेश्वराने आमच्याजवळ मदतीसाठी पाठवले. त्यांच्यामुळे माझ्यावर उपचार होऊ शकले. त्यामुळे मदत करणाऱ्यांचे या वृद्ध दाम्पत्याने आभार मानले.
फोटो ::::::::::::::
कोरोनावर मात केलेले माळशिरस येथील सरगर दाम्पत्य.