जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित; प्रत्येक व्यक्तीला रोज मिळतयं ५५ लिटर शुद्ध पाणी
By शीतलकुमार कांबळे | Published: August 7, 2023 04:22 PM2023-08-07T16:22:47+5:302023-08-07T16:23:04+5:30
जल जीवन मिशन:या गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.
सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७२ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे. या गावांमध्ये १०० टक्के घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर शुध्द व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे. सध्या जिल्हयातील ८५५ गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामे योजनेची सुरु आहेत. यामधील २४ गावातील योजना पुर्ण झाल्या असुन ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी आहे. यामधील ७७ गावे ग्रामसभा घेऊन हर घर जल घोषित केली आहेत.
या गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.तसेच उर्वरित गावातील प्रत्येक कुटुंबाला १०० टक्के नळ जोडणी पुर्ण होत आहे. त्यांना सुध्दा हर घर जल म्हणुन घोषित करुन ती गावे संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात येत आहेत.