मंगळवेढा तालुक्यात ७९.५९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:55+5:302021-01-16T04:25:55+5:30

मंगळवेढा : तालुक्यामध्ये २१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान झाले. हे मतदान जवळजवळ ७९.५९ टक्के इतके मतदान आले आहे. यामध्ये ...

79.59 percent polling in Mangalvedha taluka | मंगळवेढा तालुक्यात ७९.५९ टक्के मतदान

मंगळवेढा तालुक्यात ७९.५९ टक्के मतदान

Next

मंगळवेढा : तालुक्यामध्ये २१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान झाले. हे मतदान जवळजवळ ७९.५९ टक्के इतके मतदान आले आहे. यामध्ये नंदेश्वर, बोराळे, मरवडे, सिद्धापूर, माचणूर, गणेशवाडी, लवंगी, सलगर बुद्रुक या गावांमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने परगावी राहणारे ऊसतोड मजूर, मुंबई, पुणे, आदी भागांतून नागरिकांना मतदानासाठी खास करून उमेदवाराने आणले होते. विविध ठिकाणी मतदारांच्या जेवणाची सोय प्रमुख उमेदवारांनी केली होती.

सिद्धापूर, नंदेश्वर, मरवडे, सलगर बुद्रुक याठिकाणी मतदान झाले. सकाळपासूनच मतदानाला महिला व पुरुषांची गर्दी होती. सकाळी-सकाळीच वयोवृद्ध मंडळींना मतदानाला आणण्यासाठी वाहनांची सोय केली होती. तालुक्यामध्ये या निवडणुकीत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्यासह विविध निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

असे झाले मतदान

मरवडे ४७०६ पैकी ३८१७, लमाणतांडा १३२९ पैकी १०३९, कात्राळ-कर्जाळ ११६९ पैकी ८६७, बोराळे ४१४३ पैकी ३३९७, सिद्धापूर २९३८ पैकी २५२५, अरळी २०८० पैकी १७६१, तांडोर ९३२ पैकी ८२५, हुलजंती ३७०४ पैकी २९५४, आसबेवाडी ९२८ पैकी ८५६, सलगर बु. ३४६८ पैकी २६८७, लवंगी २३८६ पैकी १७९१, डोणज ३०८८ पैकी २५७३, माचणूर १७९५ पैकी १५०६, तामदर्डी २२१ पैकी १७०, कचरेवाडी २३९८ पैकी १८७३, गणेशवाडी १२९५ पैकी ९७९, लेंडवे चिंचाळे २०८५ पैकी १७४७, महमदाबाद शे. ७०२ पैकी ६५८, घरनिकी ४३३ पैकी ३६९, मल्लेवाडी ८४६ पैकी ७२६, भोसे ४७४६ पैकी २८६६, नंदेश्वर ५२८३ पैकी ४३४४ असे २१ ग्रामपंचायतींसाठी ७९.५९ टक्के मतदान झाले आहे.

फोटो ओळी :::::::::::::::::::::

१५पंड०१

डोणज (ता. मंगळवेढा) येथे मतदानासाठी मतदारांची मोठी रांग लागली असल्याचे छायाचित्र. (छाया : विलास मासाळ)

१५पंड०२

डोणज (ता. मंगळवेढा) येथे व्हिलचेअरवरून मतदानासाठी जाताना महिला मतदार. (छाया : विलास मासाळ)

Web Title: 79.59 percent polling in Mangalvedha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.