सोलापूरातील लक्ष्मी मार्केटचा ८ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:14 PM2018-06-21T14:14:30+5:302018-06-21T14:14:30+5:30

सहा महिन्यांत होणार काम पूर्ण, स्मार्ट सिटी योजनेतून करणार विकास

8 crores Plan of Laxmi Market in Solapur | सोलापूरातील लक्ष्मी मार्केटचा ८ कोटींचा आराखडा

सोलापूरातील लक्ष्मी मार्केटचा ८ कोटींचा आराखडा

googlenewsNext
ठळक मुद्देहोम मैदानाच्या विकासासाठी २ कोटी ४५ लाख खर्चरंगभवन चौकात सौरउर्जेवर आधारित पब्लिक प्लाझा उभारण्याचे काम सुरू स्मार्ट सिटी एरियातील नागरिकांना डस्टबिनचे वाटप

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे आठ कोटी खर्चून लक्ष्मी मंडईचा लूक बदलण्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांबरोबर मंगळवारी बैठक घेऊन लक्ष्मी मार्केटचा लूक बदलण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सुमारे ८ कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

लक्ष्मी मार्केटची इमारत हेरिटेज आहे. त्यामुळे इमारतीला हात न लावता परिसर सुधारणा करण्यात येणार आहेत. हा भाग स्मार्ट सिटी एबीडी एरियातील आहे. सध्या सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मंदिराच्या मागील द्वाराजवळ हे ऐतिहासिक मार्केट आहे. मार्केटच्याभोवती झालेले अतिक्रमण व आतील विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. 
हा लूक बदलण्यात येणार आहे.

इमारतीचे नूतनीकरण करून सभोवतालचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. परिसरात वनराई व पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये भाजी, किराणा, फळे, मसाला बाजार असे वेगवेगळे विभाग करण्याचे नियोजन आहे. यामुळे आतील ओटे व गाळे वाढणार असल्याने अनेक व्यापाºयांना संधी मिळणार आहे. चारही बाजूने प्रशस्त रस्ते, सर्व व्यापाºयांना फक्त मार्केटमध्येच बसण्याची सक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच लक्ष्मी मार्केटचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीची तीन वर्षे
- केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरची नवव्या क्रमांकाने घोषणा होऊन २५ जून रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सद्यस्थितीत देशातील स्मार्ट सिटीचा विचार करता कामाच्या बाबतीत सोलापूर आता २४ व्या क्रमांकावर गेले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फक्त १४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामधील स्मार्ट रोडचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

रंगभवन चौकात सौरउर्जेवर आधारित पब्लिक प्लाझा उभारण्याचे काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहर स्वच्छ करण्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी एरियातील नागरिकांना डस्टबिनचे वाटप करण्याचा ठेका नागपूरच्या पॉली फिल्म कंपनीला दिला आहे. घंटागाड्यांतून कचरा ट्रान्सफर करण्यासाठी चार ठिकाणी स्टेशनची उभारणी करण्याचा ठेका टीपीएस इन्फ्राला दिला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जागृती करण्याचा ठेका पुण्याच्या मिटकॉन कन्स्लटन्सीला दिला आहे. एलईडी स्ट्रिट लाईट उभारणी, रूफ टॉप सोलरचे काम सुरू आहे. हुतात्मा बागेचे सुशोभीकरण सुरू आहे.

- होम मैदानाच्या विकासासाठी २ कोटी ४५ लाख खर्च येणार असून, टेंडर काढले आहे. पासपोर्ट कार्यालयाजवळ नर्सरी    उभी केली जाणार आहे. एबीडी एरियात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीत बदल करण्याचा ठेका देण्यात आला आहे. पाच ठिकाणी १0 ई-टॉयलेट उभारण्यात आले आहेत.स्काडा, बायोमेट्रिक व विविध कामांच्या प्रगतीसाठी महापालिकेच्या मागील बाजूस कमांड व कंट्रोल मुख्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. ईदगाह मैदानाचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्र, अर्बन डिझाईन प्रोजेक्ट घेण्यात येणार आहेत.

Web Title: 8 crores Plan of Laxmi Market in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.