शहरात आढळले ८० प्रकारचे फुलपाखरे; वन विहार, स्मृती वनात वास्तव्य  

By शीतलकुमार कांबळे | Published: October 8, 2023 01:14 PM2023-10-08T13:14:34+5:302023-10-08T13:15:04+5:30

फुलपाखरे जाताहेत शहापासून दूर

80 types of butterflies found in the solapur city; Van Vihar, living in the memory forest | शहरात आढळले ८० प्रकारचे फुलपाखरे; वन विहार, स्मृती वनात वास्तव्य  

शहरात आढळले ८० प्रकारचे फुलपाखरे; वन विहार, स्मृती वनात वास्तव्य  

googlenewsNext

सोलापूर : काही वर्षांपूर्वी पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फुलपाखरु दिसत होते. हे फुलपाखरू आता खूप कमी प्रमाणात आढळत आहेत. शहरापासून दूर जात श्री सिद्धेश्वर वन विहार व स्मृती वन येथेच अधिक प्रमाणात फुलपाखरू आढळत आहेत. शहरात  ८० प्रकारचे फुलपाखरे आढळली आहेत.

देशात दिड हजारांपेक्षा अधिक फुलपाखरु आढळतात. सोलापुरात 80 पेक्षा जास्त फुलपाखरु आहेत. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. अधिक अभ्यास केल्यास शहरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींच्या संख्येत वाढ होईल. मध गोळा करण्यासाठी लागणारे झाड (नेक्टर प्लांट), अंडी घालण्यासाठी लागणारे झाड (होस्ट प्लांट) असल्यास फुलपाखरांची संख्या वाढते. शहरात अशी झाडे कमी झाली आहेत. अनेक ठिकाणी घरासमोरील बागा काढून घरे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्वी सारखी दिसणारे फुलपाखरू आता शोधावी लागत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम होत आहे.

वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे अजीत चौहान यांनी शहरात आढळणाऱ्या फुलपाखरांचे फोल्डर प्रकाशित केले आहेत. या फोल्डरमध्ये शहरात सामान्यपणे आढळणाऱ्या ४० वेगवेगळ्या जातींच्या फुलपाखरांचे फोटो समाविष्ट केले आहेत. फोल्डर (माहिती पुस्तिका) बनविताना त्यांनी शहरातील विविध ठिकाणी फुलपाखरांचा शोध घेतला. मात्र, शहरात कमी व शहरापासून दूर असणाऱ्या जागेत फुलपाखरु जास्त आढळत असल्याचे निरीक्षण त्यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.

Web Title: 80 types of butterflies found in the solapur city; Van Vihar, living in the memory forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.